After Funeral Take Bath Is Necessary : अगदी लहानपणापासूनच आजी-आजोबा, आई-वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या मनात कायम कोरल्या जातात. इथे जाऊ नका?, अमुक अमुक ठिकाणाहून आल्यानंतर कोणते नियम पाळले पाहिजेत हे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेल्या गोष्टी आहेत. पिढ्यानपिढ्या त्याच गोष्टी आपणही फॉलो करत आलो आहोत. पण या गोष्टींमागचा हेतू व उद्देश नेमका काय? याचा तुम्ही कधी विचार केला आहात का?. एखाद्या व्यक्तीवर अत्यंसंस्कार झाल्यानंतर घरी येताच अंघोळ करावी हे पूर्वाजांपासूनच चालत आलेली परंपरा आहे. पण असं का? याचं उत्तर अनेकांना ठाऊकही नाही.
अत्यंसंस्कारावरुन आल्यानंतर आंघोळ करावी यामागे धार्मिक श्रद्धा असेल. पण त्याबरोबरच यामागे एक वैज्ञानिक कारणदेखील आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर कुजण्यास सुरवात होते. याला इंग्रजीत Decompose म्हणतात. शरीराचे विघटन झाल्यावर त्यात अनेक प्रकारचे जीवाणू वाढू लागतात. हे जीवाणू मृत शरीराच्या आजूबाजूच्या लोकांवर हल्ला करतात. हे घातक जीवाणू दूर करण्यासाठी आंघोळ करणे आवश्यक आहे.
आणखी वाचा – तो परत येतोय! ‘देवमाणूस’ मालिकेचा तिसरा भाग येणार, थ्रिलर प्रोमोने वेधलं लक्ष, किरण गायकवाडच असणार का?
जुन्या काळात आरोग्य सेवा चांगल्या नव्हत्या. लसीकरणाबाबत तितक्या सुविधा आणि जनजागृती नव्हती. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीचा गंभीर संसर्गजन्य आजारांमुळे मृत्यू होत होता. त्यामुळे हे टाळण्यासाठी अंघोळ करून अंत्यसंस्कारानंतर कपडे बदलण्याची प्रथा सुरू झाली. ती आजतागायत सुरू आहे. असे मानले जाते की, मानवी शरीर पृथ्वी, पाणी, अग्नि, आकाश आणि वायु या पाच घटकांनी बनलेले आहे.
आणखी वाचा – “चांगल्या-वाईट आठवणी…” ‘अप्पी आमची…’ मालिका संपताच अर्जुन भावुक, म्हणाला, “एकदा संपलं की…”
मृत शरीराला जाळल्याने ही पाच तत्वे आपापल्या घटकांमध्ये मिसळतात आणि पुनर्जन्म झाल्यावर पुन्हा शरीरात मिसळतात. त्यामुळे मृत व्यक्तीला पोहोचवून आल्यावर अंघोळ केलीच पाहिजे. मृत पावलेली व्यक्ती कुठलीही असो, घरातली किंवा बाहेरची… पण तिच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलेल्यांनी घरी येऊन अंघोळ करणे अत्यंत आवश्यक आहे.