Divya Pugaonkar Engagement : ‘मुलगी झाली हो’, ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकांमधून अभिनेत्री दिव्या पुगांवकर घराघरांत लोकप्रिय झाली. या दोन्ही मालिकांमध्ये दिव्याच्या मुख्य भूमिका होत्या. यानंतर सध्या दिव्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत महत्त्वाच्य भूमिकेत झळकताना दिसत आहे. श्रीनिवास आणि लक्ष्मी यांच्या धाकट्या मुलीची म्हणजेच जान्हवीची व्यक्तिरेखा दिव्या साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेत जान्हवी आणि जयंत यांचा भव्यदिव्य लग्नसोहळा पाहायला मिळाला होता. मात्र, आता जान्हवीची भूमिका साकारणारी दिव्या खऱ्या आयुष्यात नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. दिव्याची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. लग्नासाठी सेटवरचे तिचे सहकलाकार देखील उत्सुक आहेत.
अशातच दिव्याच्या मेहंदी समारंभाचे अनेक फोटो समोर आले. यानंतर दिव्या-अक्षय यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले. दिव्या व अक्षय यांनी त्यांचा साखरपुडा समारंभ अगदी थाटामाटात उरकला आहे. याशिवाय दिव्या व अक्षय यांच्या संगीत सोहळ्याची झलकही पाहायला मिळाली. दोघांनी भन्नाट डान्स करत त्यांचा संगीत समारंभ गाजवला. दिव्या व अक्षयचा थिरकतानाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तर साखरपुड्यासाठी दिव्या नवरी मुलीच्या वेशात खूपच छान दिसत होती.
आणखी वाचा – लगीनघाईत अंकिता वालावलकरच्या गाडीचा अपघात, मोठं नुकसान पण दोघेही सुखरूप, व्हिडीओद्वारे दाखवली झलक
साखरपुडयासाठी दिव्याने हिरव्या रंगाची सुंदर अशी साडी, हातात हिरवा चुडा, त्याबरोबर गोल्डन ज्वेलरी, केसात गजरा असा पारंपरिक लूक केला होता. तर हिरव्या साडीवर कॉन्ट्रास्ट अशी लाल रंगाची शॉल तिच्या लूकमध्ये भर घालत होती. अभिनेत्रीनं साखरपुड्यात आपल्या होणाऱ्या नवऱ्यासह सुंदर फोटोशूट देखील केलं. दिव्याच्या लाघवी सौंदर्यावर मराठमोळा लूक अगदी शोभून दिसला.
दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत असं आहे. या दोघांचा तिलक समारंभ १९ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला होता. यानंतर गेल्या काही वर्षात अनेकदा अभिनेत्रीकडे ती लग्नबंधनात केव्हा अडकणार याबद्दल विचारले.अखेर दिव्याच्या घरी आता लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. दिव्याचा नवरा अक्षय घरत फिटनेस मॉडेल म्हणून ओळखला जातो. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर तसेच उद्योजक असं नमूद केलेलं आहे.