अनेक मालिका, नाटक, चित्रपट, वेब सिरीज, रिऍलिटी शोज अनेक काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. रिऍलिटी शोजच्या जगतातील सर्वात लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. मागील १७ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला शो म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाची ख्याती आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर या शो मध्ये खेळवले जातात. ९० दिवस कुटूंबातील कोणत्याही सदस्या सोबत संपर्क न ठेवता, मोबाईल, लॅपटॉप अशा कोणत्याही साधनांचा वापर न करता अनोळखी लोकांसोबत एका बंदिस्त घरात राहणं हा या शोचा फॉरमॅट आहे. बॉलीवूड मधील भाईजान म्हणून लौकिक मिळवणारा अभिनेता सलमान खान या शोच होस्टिंग मागील बऱ्याच सीझन्स पासून करत आहे. वेगवेगळे गेम्स, एकमेकांच्या आयुष्या बद्दल केले जाणारे खुलासे अशा अनेक गोष्टींचा उलगडा या शो च्या माध्यमातून केला जातो.(bigboss vocie)

१७ वर्षांच्या १७ सीझन्स मध्ये प्रत्येक वेळी बिग बॉसच्या घरातील काही गोष्टी बदलल्या जातात. पण या शो मध्ये अशी एक गोष्ट आहे जी एकही सीझन मध्ये बदलली गेली नाही ती गोष्ट म्हणजे बिगबॉसच्या घरात ऐकू येणारा बिग बॉसचा आवाज. हा आवाज नक्की कोणाचा आहे या बद्दल अनेकांना कुतुहूल होत. प्रसिद्ध व्हॉइस आर्टिस्ट अतुल कपूर(atul kapoor voice) आणि विजय विक्रम सिंग(vijay vikram singh voice) या दोन व्यक्ती बिग बॉसचा खरा आवाज म्हणून ओळखल्या जातात. अतुल आणि विजय बिग बॉस मधील संपूर्ण घटनाक्रमानुसार आवाज देत असतात.
दमदार आवाजासाठी मानधन ही दमदार(bigboss vocie)
कार्यक्रमातील वेळेच्या घोषणा या विजय विक्रम सिंग यांच्या आवाजात असतात तर कार्यक्रमातील इतर महत्वाच्या घोषणा किंवा संवाद अतुल कपूर यांच्या आवाजात दिल्या जातात. एका रिपोर्ट नुसार व्हॉइस आर्टिस्ट अतुल कपूर हे प्रत्येक सिझनला तब्बल ५० लाख इतकं मानधन आकारतात तर विजय विक्रम सिंग प्रत्येक सिझनला १० ते २० लाख रुपयांची कमाई करतात.(bigboss hindi)
हे देखील वाचा – सोनू सूदने केवळ ५ हजार रुपये घेऊन गाठली होती मुंबई आज आहे ‘इतक्या’ कोटींचा मालक, ‘हा’ आहे एका चित्रपटाच्या मानधनाचा आकडा
बिगबॉस मधील बिगबॉसचं आवाज देखील प्रेक्षकांना खेळाप्रती आकर्षित करतो. तसेच खेळाडूंना देखील बिगबॉसचा हा आवाज आपलासा करणारा वाटतो. बिगबॉसच्या शेवटच्या सीझनमध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेने फायनल पर्यंत मजल मारली पण सीझनचा विजेता मात्र ठरला लोकप्रिय रॅपर MC stan.