रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : रिक्षाने प्रवास करताना अपघात, दुखापत होऊनही आईने अमृता खानविलकरला सांगितलंच नाही, रुग्णालयात गेली अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 23, 2025 | 3:47 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actress Amruta Khanvilkar shared Instagram story of her mother's hand being injured in a rickshaw accident

रिक्षा अपघातात अमृता खानविलकरच्या आईच्या हाताला दुखापत, अभिनेत्रीने स्वत:च सांगितली परिस्थिती

मराठी सिनेसृष्टीतील काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अमृता खानविलकर. आपल्या अभिनयाने अमृताने मराठीसह हिंदी प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच अमृता नृत्यातही पारंगत आहे. ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची व नृत्यविष्काराची झलक सर्वांना दाखवली आहे. आपल्या अभिनय व नृत्याने चर्चेत राहणारी अमृता सोशल मीडियावरही सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. सोशल मीडियावरील तिचे आईबरोबरचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमधून तिचा आईबरोबरचा खास बॉण्ड दिसून येतो. अशातच अमृताने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (amruta khanvilkar mother’s hand injured)

अमृताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आईचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिची आई हॉस्पिटलमध्ये असून तिच्या आईच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे पाहायला मिळत आहे. या दुखापतीचे कारण अमृता आईला विचारते. मात्र त्या काही सांगत नाहीत. त्यामुळे अमृताच आईला झालेल्या दुखापतीबद्दल सांगू लागते. याबद्दल ती असं म्हणते की, “आमच्या आईसाहेबांनी हात तोडून घेतलेला आहे. नव्या घरी रिक्षाने येत असताना आई आणि आमची मदतणीस ज्या रिक्षात होती. त्या रिक्षाला कुणीतरी धडक दिली. नंतर एक अख्खा दिवस आईने मला काहीच सांगितलं नाही की, तिचा हा अपघात झाला आहे.

आणखी वाचा – मुलगी झाली हो! शशांक केतकरच्या घरी चिमुकलीचं आगमन, घरीच केलं बारसं, नाव ठेवलं…

यापुढे अमृताने असं सांगितलं की, “पुढच्या दिवशी मी सकाळी पाहिलं की, तिचा हात प्रचंड काळा-निळा झाला आहे. तेव्हाही ती काही बोलली नाही. मला म्हणाली की मला लिफ्टचा दरवाजा लागला आहे. तर म्हटलं बघू म्हटलं काय झालं? त्यानंतर आम्ही थेट हॉस्पिटलमध्ये गेलो. तेव्हा कळलं की, तिचा (collarbone) म्हणजेच तुमचा हात तुमच्या शरीराशी जोडतो ते हाड तुटलं आहे”.

आणखी वाचा – कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडू लागली कश्मिरा शाह, नवऱ्याने उचलण्याचा प्रयत्न केला पण…; Video Viral

दरम्यान, अमृताच्या कामबद्दल बोलायचे झाले तर, ती नुकतीच ‘संगीत मानापमान’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या ‘वंदन हो’ गाण्यातील नृत्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्याआधी ती ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटात महाराणी येसूबाईच्या भूमिकेत दिसली होती. तसंच ‘लाइक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटातही ती एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाली होती.

Tags: actress amruta khanvilkar Amruta Khanvilkar motheramruta khanvilkar mother rickshaw accidentamruta khanvilkar mother's hand injured
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Saif Ali Khan Attacked

"मीच हे सगळं केलं", सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीने दिली कबुली, गुन्ह्याची कबुली देत सांगितला संपूर्ण घटनाक्रम

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.