Karan Veer Mehra Lifestyle : सलमान खानचा रिॲलिटी शो ‘बिग बॉस सीझन १८’ चा ग्रँड फिनाले नुकताच संपन्न झाला. यंदाच्या या सिझनमध्ये ‘बिग बॉस’ची मानाची ट्रॉफी करणवीर मेहरा याने जिंकली. त्यामुळे करणवीर मेहरा सध्या खूप चर्चेत आहे. तिने रोहित शेट्टीच्या रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी सीझन १४’ चेही विजेतेपद पटकावले आहे. ‘बिग बॉस १८’ च्या विजेतेपदावर करणवीर मेहराने आपलं नाव कोरलं आहे. ‘बिग बॉस १८’ च्या विजेत्याला ‘बिग बॉस’ची ट्रॉफी मिळाली असून ५० लाख रुपये रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. करणवीर मेहरा गेल्या १९ वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. त्याने अनेक टीव्ही शो केले. २००५ पासून त्याने टीव्हीच्या दुनियेत प्रवेश केला. पण त्याआधी तो रंगभूमीवर सक्रिय होता.
अभ्यासात कमी आणि अभिनय क्षेत्रात जास्त सक्रिय असल्याचे त्याने सांगितले होते. २००५ मध्ये त्याने ‘रिमिक्स’ या मालिकेपासून त्याच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्याने वेगवेगळ्या शोमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या.अंकिता लोखंडेबरोबर ‘पवित्र रिश्ता’ मध्येही काम केलं. ‘बातें कुछ अंकही सी’, ‘बेहेनीन’, ‘विरद्ध’, ‘पुका – दिल से दिल तक’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये करणने महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. याशिवाय त्याने चित्रपटांमध्येही काम केले. ‘रागिनी एमएमएस 2’, ‘लव्ह स्टोरी २०५०’, ‘बदमाशियां’, ‘मेरे डॅड की मारुती’मध्ये तो झळकला. ‘पॉइजन 2’, ‘इट्स नॉट सिंपल’ आणि ‘आमेन’ या वेबसीरिजमध्येही त्याने काम केले.
करणवीर मेहराचे वैयक्तिक आयुष्य त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा जास्त चर्चेत राहिले. त्याने आयुष्यात दोनदा लग्न केले आहे. पहिले लग्न २००९ मध्ये झाले होते आणि आठ वर्षांनी २०१८ मध्ये हे नाते संपले होते. त्याने त्याची बेस्ट फ्रेंड देविका हिला १० वर्षे डेट केले आणि नंतर लग्न केले. पण हे लग्न तुटल्यामुळे तो दु:खी झाला आणि या सगळ्याला स्वत:ला जबाबदार समजू लागला. त्याने ‘बॉम्बे टाईम्स’ला सांगितले होते की, “त्याने लग्न केले नसते तर दोन आयुष्य उद्ध्वस्त झाले नसते”.
करणवीर मेहराने २०२१ मध्ये अभिनेत्री निधी सेठशी दुसरे लग्न केले. त्यांनी गुरुद्वारात सात जन्माचे वचन दिले होते. पण नंतर त्यांच्यात काहीच सुरळीत होत नव्हते आणि २०२३ मध्ये त्यांचे हे नातेही तुटले. ‘खतरों के खिलाडी १४’मध्ये तो शिल्पा शिंदेबरोबर लग्नाबद्दल बोलताना तो दिसला होता. यावर तो म्हणाला होता की,’ते खूप चांगले मित्र आहेत आणि एकमेकांशी मस्करी करत राहतात. पण भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही’. पहिले लग्न तुटल्यानंतर करणवीर मेहराने म्हटले होते की, जर त्याने दुसरे लग्न केले नाही तर त्याला नक्कीच वडील व्हायचे आहे.
आणखी वाचा – जबरदस्त डान्स अन् कलाकारांचा दंगा, शिवानी सोनार व अंबर गणपुळेच्या संगीत सोहळ्याचा Inside Video
मात्र ‘नवभारत टाइम्स’शी बोलताना त्याने आता हे करणार नसल्याचे सांगितले. कारण मुलांचे संगोपन करणे सोपे नाही. त्याची इच्छा असल्यास तो आपल्या बहिणीच्या मुलांना दत्तक घेऊ शकतो. २०१६ मध्ये करणवीर मेहराचा भीषण बाइक अपघात झाला होता. पाच महिन्यांहून अधिक काळ अंथरुणाला खिळून असल्याचे त्यांनी सांगितले. त्या दिवसांत तो झोपण्यासाठी दारू प्यायचा आणि त्यामुळे त्याला दारूचे व्यसन लागले. मात्र, नंतर त्याने स्वत:वर नियंत्रण ठेवले आणि पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला.