बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आलेला दिसतो. आजवर त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रत्येक चित्रपटातील त्याच्या विविध भूमिकांना मोठ्या प्रमाणात लोकांची पसंतीदेखील मिळाली आहे. गेल्या दोन वर्षांममध्ये त्याचे ‘जवान’, ‘पठाण’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली. गेली अनेक वर्ष तो चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे. मात्र आजवर त्याच्या अफेअर्सच्या चर्चा कधीही समोर आल्या नाहीत. त्याचे एकाही अभिनेत्रीबरोबर कधीही नाव जोडलं गेलं नाही. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये शाहरुखचे नाव कोणत्याही अभिनेत्रीबरोबर जोडले गेले नसल्याबद्दल विचारले. त्यावर त्याने एक उत्तर दिले त्याची चर्चा खूप रंगली आहे. ( shahrukh khan on extra marital affairs)
एका मुलाखतीदरम्यान शाहरुखला विचारले की, “इतक्या वर्षांच्या करियरमध्ये कोणत्याही अभिनेत्रीबरोबर नाव कसं जोडलं गेलं नाही?”, त्यावर शाहरुखने उत्तर दिले की, “मला वाटतं की मी समलैंगिक आहे. कोणत्याही अभिनेत्रीबरोबर नाव का नाही जोडलं गेलं असं मला प्रत्येकजण विचारतो. मला नाही माहीत. ते सगळे माझे मित्र आहेत. मी नेहमी सगळ्यांना हेच उत्तर देतो. मी या लोकांसोबत काम करतो आणि मी माझ्या पत्नीबरोबर खुश आहे. मी सगळ्या अभिनेत्रीबरोबर फक्त काम करतो”.
पुढे तो म्हणाला की, “मी या सगळ्यांबरोबर जोडला गेलो आहे. त्यांच्यावर मी प्रेमदेखील करत. मी या सगळ्या अभिनेत्रींबरोबर चित्रपटांमध्ये काम करतो त्यामुळे मी खूप वेळ त्यांच्याबरोबर घालवतो. त्या माझ्या घरी येतात मी त्यांच्या घरी जातो. एकमेकांना कॉल करतो आणि खूप वेळ बोलतो. आम्ही व्यावसायिक व वैयक्तिकरित्या एकमेकांची मदत करतो”.
दरम्यान २०११ साली शाहरुख व प्रियांका चोप्राच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक पार्टी, नाइट क्लब या ठिकाणी त्यांना अनेकदा एकत्रित पाहिले गेले होते. मात्र शाहरुखची पत्नी गौरी खानने या सगळ्या अफवा असल्याचे सांगितले होते. त्यांचे नातं म्हणजे चांगली मैत्री असल्याचे गौरीने स्पष्ट केले होते. शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच सिद्धार्थ आनंदच्या ‘किंग’ या चित्रपटात दिसून येणार आहे.