रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

म्हणून भर पाऊसात ‘महालक्ष्मी ते दादर’ रेल्वे रुळावरून धावत गेले मामा

सौरभ जाधवby सौरभ जाधव
जुलै 24, 2023 | 10:09 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
ashok saraf struggle

ashok saraf struggle

अनेक कलाकार हे त्यांच्या अभिनया व्यतिरिक ओळखले जातात ते प्रेक्षकांप्रती त्यांच्या मनात असलेल्या आदरयुक्त भावनेसाठी. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी शक्य ते सर्वकाही करणाऱ्या कलाकारांच्या यादीत एक नाव हमखास घ्यावं ते म्हणजे अभिनेते अशोक सराफ. त्याचं कारणही असच आहे. नाटकाच्या एका प्रयोगासाठी मुंबईच्या तुफान पाउसामध्ये अशोक सराफ महालक्ष्मी ते दादर स्टेशन रेल्वे रुळावरून चालत गेले होते. वाचा नक्की काय आहे तो किस्सा आजच्या जपलं ते आपलं या भागात.(ashok saraf struggle)

चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच अशोक सराफ हे अनेक मराठी नाटकांसाठी देखील प्रसिद्ध होते. अशोक सराफ यांच्या नाटकांपैकी ‘हिमालयाची सावली’ या नाटकाचा प्रयोग दादर येथी शिवाजी मंदिरात होता. अशोक सराफ त्याकाळी फोर्ट येथील स्टेट बँकेत कामाला होते. कामावरून थेट प्रयोगाला जाण्याचं अशोक सराफ यांनी ठरवलं. तुफान पाऊस असल्यामुळे अशोक सराफ यांनी बसमुळे ट्रॅफिकमध्ये अडकायला नको म्हणून ट्रेन ने जाणं सोयीचं समजलं आणि ते बॉम्बे सेंट्रल स्टेशनला पोहचले.(ashok saraf marathi drama)

स्टेशनवरच्या गर्दीत ही अशोक सराफ यांनी ट्रेन पकडली पण चार स्टेशन पार करण्यासाठी गाडी ने सव्वा तास लावला. प्रयोगाची वेळ जस जशी जवळ येत होती अशोक सराफ यांची घालमेल ही वाढत होती. शेवटी अशोक सराफ यांनी मधेच थांबलेल्या ट्रेन मधून उतरत सरळ रेल्वे रुळावरून दादरच्या दिशेने प्रवास सुरु केला. गडद काळोखात अशोक सराफ यांनी मागून अचानक गाडी येईल याचा ही विचार न करता, चिखल तुडवत धावत दादरच्या दिशेने प्रवास सुरु केला.

महालक्ष्मी ते दादर धावत, रेल्वे रुळावरून केलेला प्रवास पार करून अशोक मामा अखेर शिवाजी मंदिरला पोहचले. त्यांना पोहचेपर्यँत बराच वेळ झाला. मोबाइल नसल्या कारणाने तेव्हा कोणाला कळवता ही आलं नाही. पण प्रेक्षकही तेव्हा नाटकासाठी वाट बघत थांबले होते. धावपळीत झालेला हा प्रयोग देखील चांगलाच रंगला होता.(ashok saraf acting)

Tags: ashok sarafashok saraf struggle story
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kitchen Hacks
Lifestyle

Kitchen Tips : जेवण बनवताना खूपच तारांबळ होते?, मधुराच्या ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

मे 11, 2025 | 5:00 pm
Marathi actor chetan dalvi journey
Entertainment

ब्रेनस्ट्रोक, इंडस्ट्रीला विसर अन्…; मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्याचा सगळ्यात वाईट काळ, आता दिसतात असे

मे 11, 2025 | 1:00 pm
Mumbai Shocking News
Women

अश्लील व्हिडीओ दाखवून आठ वर्षाच्या मुलीचे कपडे काढणारा ‘तो’ जिवंत राक्षस

मे 11, 2025 | 10:00 am
Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Next Post
Swanandi Tikekar Wedding

साखरपुडा उरकताच स्वानंदीने लग्नाबद्दल केला खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.