97th Oscar Awards nominations : ९७ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठीची नामांकने गुरुवारी जाहीर करण्यात आली आहेत. बोवेन यांग आणि रॅचेल सेनॉट यांनी गुरुवारी सकाळी (भारतात संध्याकाळी ७ वाजता) चित्रपट उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारासाठी नामांकनांची घोषणा केली. यात ‘एमिलिया पेरेझ’ सर्वाधिक १३ नामांकनांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ‘द ब्रुटालिस्ट’ आणि मूव्ही म्युझिकल ‘विक्ड’ प्रत्येकी १० नामांकने आहेत. या नामांकन सोहळ्यातील भारतासाठी आनंदाची बातमी म्हणजे हिंदी भाषेत बनलेल्या ‘अनुजा’ या भारतीय-अमेरिकन चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत स्थान मिळाले आहे. अनुजाची निर्मिती प्रियंका चोप्रा आणि गुनीत मोंगा यांनी संयुक्तपणे केली आहे. (97th Oscar Awards nominations)
या श्रेणीत १८० पैकी केवळ 5 चित्रपटांना नामांकन मिळाले आहे. हा चित्रपट १७ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची मूळ भाषा हिंदी आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे गुरुवारी (२३ जानेवारी) नामांकनांची घोषणा करण्यात आली. यापूर्वी त्याची घोषणा १७ जानेवारीला होणार होती. पण लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. ‘अनुजा’ बद्दल सांगायचे झाल्यास ही दोन बहिणींची प्रेरणादायी कथा आहे, ज्या त्यांचे शोषण आणि वगळण्याच्या जगात आनंद आणि संधी शोधण्याचा प्रयत्न करतात. हा चित्रपट बालमजुरी आणि मुलींच्या शिक्षणावर हल्ला करतो. तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.
Sound off in the comments with your final #Oscars nominations predictions.
— The Academy (@TheAcademy) January 22, 2025
Join us tomorrow, January 23rd, at 8:30 AM ET / 5:30 AM PT to see who is headed to the 97th Oscars. Stream on https://t.co/8Zw5mDf3tg, https://t.co/5fKuh0mVRV, ABC, Hulu, Disney+ or the Academy’s TikTok,… pic.twitter.com/iYoCEfNYPM
सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणी
अनुजा
एक लीन
आय एम नॉट अ रोबोट
द लास्ट रेंजर
द मॅन हू कुड नॉट रिमेन साइलेंट
सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणी
एनोरा
द ब्रूटलिस्ट
ए कम्प्लीट अननोन
कॉन्क्लेव्ह
ड्यून: पार्ट टू
एमिलिया पेरेझ
आई एम स्टिल हियर
निकेल बॉयज
द सब्सटेंस
विक्ड
आणखी वाचा – 24 January Horoscope : वृषभ, मिथुन व कन्या राशीच्या लोकांना शुक्रवारी मिळणार भाग्याची साथ, जाणून घ्या…
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची श्रेणी
एड्रियन ब्रॉडी, द ब्रुटालिस्ट
टिमोथी चालमेट, ए कम्प्लीट अननोन
कोलमैन डोमिंगो, सिंग सिंग
राल्फ फिएनेस, कॉन्क्लेव
सेबेस्टियन स्टेन, द अप्रेंटिस
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणी
सिंथिया एरिव्हो, विक्ड
कार्ला सोफिया गॅस्कोन, एमिलिया पेरेझ
मिकी मॅडिसन, एनोरा
डेमी मूर, द सबस्टेंस
फर्नांडा टोरेस, आई एम स्टिल हियर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणी
शॉन बेकर, एनोरा
ब्रैडी कॉर्बेट, द ब्रूटलिस्ट
जेम्स मँगॉल्ड, ए कम्प्लीट अननोन
जॅक ऑडियर्ड, एमिलिया पेरेझ
कोरली फरगेट, द सब्सटेंस
दरम्यान, ९७ वा ऑस्कर पुरस्कार २ मार्च रोजी होणार आहे. गेल्या काही वर्षांप्रमाणे या वेळीही हा सोहळा लॉस एंजेलिसमध्ये आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे यंदाचा ऑस्कर पुरस्कार पटकावण्याचा मान कोणाकोणाला मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे