Viral Video : सध्या हवामानात खूप बदल झालेला आढळून येत आहे. मध्येच ऊन, मध्येच पाऊस अशा संमिश्र वातावरणाने उकाड्यात वाढ होत आहे. गरमीने लोक इतके त्रासले आहेत की ते थंड हवेसाठी जुगाड करताना दिसत आहेत. सततच्या उकाड्याने सगळेचजण वैतागले आहेत. दरम्यान, बरेच जणांकडे एसी असल्याने त्यांना बाहेर पडताच उष्णतेचा सामना करावा लागत आहे. तर काहींकडे एसी नसल्याने ही मंडळी अनेक जुगाड करताना दिसत आहेत. अशातच उकाड्याने वैतागलेल्या महिलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यांत त्या महिलांनी थंडाव्यासाठी केलेला जुगाड साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. उकाड्याने हैराण झालेल्या महिलांचा हा व्हिडीओ अनेकांच्या पंसतीस पडला आहे.
उकाड्यापासून बचाव व्हावा म्हणून या महिलांनी लढवलेली शक्कल पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर काहींना हसू आवरेना झालं आहे. आपल्या देशात कसा जुगाड केला जाईल आणि कधी केला जाईल याचा काही नेम नाही. अशातच उष्णतेपासून सुटका हवी म्हणून त्या महिलांनी जे केलं ते पाहून कोणीही अवाक होईल. उकाड्याने हैराण असलेल्या या महिलांनी त्यांच्या मुलांना घेऊन थेट एटीएम गाठलं आणि रात्र त्या एटीएममध्ये काढली.
हो. हे सत्य आहे. बँकांद्वारे बसवण्यात आलेल्या एटीएममध्ये वातानुकूलित यंत्र बसवण्यात आलेले असते. आणि काही एटीएमच्या बाहेर सुरक्षा रक्षक नसतात. योग्य ती संधी साधत या महिलांनी थंडाव्याचा आनंद लुटण्यासाठी थेट एटीएम गाठले आहे. समोर आलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये, असं पाहायला मिळत आहे की, काही महिला या त्यांच्या मुलांसह एटीएममध्ये बसल्या आहेत. तर त्यांची मुलं एसीच्या थंडाव्यात झोपली आहेत. तर त्या महिला बसून थंड हवेचा आनंद लुटत आहेत.
हा व्हिडीओ @studentgyaan या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लिहिले आहे की, “खूपच उकाडा आहे भाऊ”. तर “उकाड्यावर उपाय”, असे व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये गंमतीत लिहिले आहे. सदर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून या व्हिडीओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.