Vaishnavi Hagawane Death Case : सध्या महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे या प्रकरणाने खळबळ माजली आहे. पुण्यातील मुळशी तालुक्यात घडलेली ही घटना ऐकताच पायाखालची जमीन सरकली. सासरी हुंड्यापायी होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं वैष्णवी हगवणेच्या कुटुंबाने आरोप केला आहे. सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलले. १६ मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केली. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या सासरच्या मंडळींना म्हणजेच पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची सध्या कसून चौकशी सुरु आहे. वैष्णवीच्या आत्महत्येच्या प्रकरणावरुन आता देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.
वैष्णवीच्या मृत्यूने राजकीय क्षेत्रात वाद पेटला आहे. कारण तिचे सासरे आणि दीर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते होते. मात्र अजित दादांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. शिवाय, आता कलाविश्वातूनही या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेता हेमंत ढोमे, पुष्कर जोग, प्रवीण तरडे या कलाकारांनी पोस्ट शेअर करत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. यापाठोपाठ आता लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेनेही पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
आणखी वाचा – पाचव्यांदा बाबा होणार अरमान मलिक?, दुसरी पत्नी पुन्हा गरोदर?, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

अश्विनीने याबाबतची पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “ही माणसं शिकलेली, पैशाने श्रीमंत असली तरी ही मानसिकता की सूनेला मारहाण करुन दरवेळी माहेरकडून काही ना काही आणायला सांगणे ही क्रूर बाब आहे आणि आरोपींना योग्य ती शिक्षा व्हायला हवी. आता जर हे प्रकरण दाबले तर पुन्हा एकदा पैसे आणि पद यांचा विजय होईल आणि न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाईल. यावर आताच वचक बसणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा उल्लेख करत आपलीच लाडकी बहीण या घटनेचा जाहीर निषेधही केला आहे”.
आणखी वाचा – “एका मुलीचा बाप म्हणून…”, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “गप्प बसून…”
वैष्णवी हगवणे हिने सासरच्या हुंडा प्रकरणावरुन होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. वैष्णवी आणि सशांकचा प्रेमविवाह आहे. त्यांचे लग्नही अगदी शाही थाटामाटात संपन्न झाले. या लग्नाची पुण्यात जोरदार चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली होती. लग्नात वैष्णवीला माहेरकडून ५१ तोळे सोने, चारचाकी आलिशान गाडी, चांदीची भांडी, आणि इतर महागड्या वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या होत्या. शिवाय माहेरपणाला आल्यावर वैष्णवी तिच्या आई-वडिलांकडून ५० हजार, १ लाख रुपये कॅश वेळोवेळी घेऊन जाताना दिसली.