Vaishnavi Hagawane Death Case : सध्या पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चर्चेत आलं आहे. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली असल्याचे उघड झाले. आणि या गंभीर गुन्ह्यात हगवणे कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. वैष्णवीची सासू, सासरे, पती, दीर आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. आता हे प्रकरण न्यायालयात पोहचलं आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या वैष्णवी विरोधात राजेंद्र हगवणेंच्या वकिलांनी आरोप-प्रत्यारोप केल्याचं समोर आलं आहे. यावेळी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयासमोर करण्यात आली असल्याचं समोर आले.
आरोपींच्या वकिलाकडून युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यावेळी, न्यायाधीशांनी आरोपींना पोलीस कोठडी दरम्यान पोलीसांकडून काही त्रास झाला का, हे विचारले असता पाचही आरोपींनी नाही असे उत्तर दिले. याप्रकरणी, आरोपी वैष्णवीचा नवरा शशांक, आई लता आणि नणंद करिश्माला एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवण्यात आली असून सासरे राजेंद्र आणि सुशील यांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.
याप्रकरणातील फरार निलेश चव्हाण कुठे आहे, याची चौकशी अद्याप सुरु आहे. मोबाईलमधील काही पुरावे, तसेच, आरोपींनी हुंड्यात मिळालेले ५१ तोळे सोने कुठे आहेत याचा तपास अद्याप बाकी आहे. तर, आरोपींनी वैष्णवीला मारहाण केलेली हत्यारे आणि रॉडही ताब्यात घेण्याचे काम बाकी आहे. त्यामुळे, आरोपींना पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी वैष्णवीच्या वडिलांच्या वकिलांनी केली होती. त्यानुसार, न्यायालयाने पोलीस कोठडीत वाढ केली आहे.
हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांकडून याबाबत विरोध पाहायला मिळाला. आरोपींना पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद यावेळी ते करताना दिसले. वैश्नवीचे न्यायालयात चारित्र्य खराब करण्याचा प्रयत्न वकिलांकडून करण्यात आला. या आरोपावर हगवणेंच्या वकिलांनी न्यायालयात भाष्य करत प्रतिउत्तरही दिलं. वैष्णवीची टेंडंसी ही सुसाईड करण्याची होती, तिचे एका व्यक्तीबरोबरचा संवादही समोर आला आहे. त्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकदा रॅट पॉइझन खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारुन तिने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, असा धक्कादायक दावा राजेंद्र हगवणेच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. तसेच, आरोपी निलेश चव्हाणला अडकवण्यात येत असल्याचंही वकिलांनी म्हटलं आहे.