शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अधिपती-अक्षरामध्ये जवळीक, स्वयंपाकघरातच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले, मात्र भुवनेश्वरीला आनंद पाहवेना

Saurabh Moreby Saurabh More
जून 12, 2024 | 12:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial update Adhipati and Akshara romancing in the kitchen video viral on social media.

अधिपती-अक्षरामध्ये जवळीक, स्वयंपाकघरातच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले, मात्र भुवनेश्वरीला आनंद पाहवेना

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यातच दिवसेंदिवस मालिका रंजक वळण घेत असल्याचं पाहायला मिळतंय आणि याच रंजक वळणामुळे प्रेक्षकांचंही मालिकेला प्रेम मिळत आहे. नुकतीच अक्षराने अधीपतीला तिच्या प्रेमाची कबुलीदेखील दिली आहे. प्रेमाची कबुली दिल्यावर त्यांचं नातं अधिक फुलताना दिसत आहे. अक्षरा आणि अधिपतीचा खरा संसार आता कुठे सुरु झाला आहे. त्यामुळे प्रेक्षक अधिकच मालिकेच्या प्रेमात पडत आहेत.

नुकतीच अक्षराने अधिपतीकडे तिला वाटत असलेल्या भावना व्यक्त केल्या. अक्षराने अधिपतीच्या खास अंदाजात त्याला प्रेमाची मागणी घातली. या नवीन ट्विस्टला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. अशातच आता अधिपती-अक्षरा यांच्या फुलणाऱ्या प्रेमाचे चित्रण आणखी एक नवीन व्हिडीओ झी मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. या नवीन व्हिडीओमध्ये अधिपती व अक्षरा यांच्यातील गोड क्षण पाहायला मिळत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – अस्तिकट्यार नष्ट करण्याचा रुपालीचा प्रयत्न, विरोचकाच्या खेळीत राजाध्यक्ष कुटुंब फसणार, मात्र नेत्रा खेळणार नवा डाव

या नवीन व्हिडीओमध्ये अधिपती अक्षराच्या लाजण्याचे कौतुक करत तिला आणखी लाजायला सांगत आहे. अक्षरा लाजत स्वयंपाक घरात घुटमळताना दिसते. तर तिच्यामागे अधिपतीही घुटमळताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अक्षरा त्यांना तिथून जायला सांगतानाच नकळत तिला गरम भांड्याचा चटका लागतो आणि अक्षराला चटका लागल्याचे कळताच अधिपती तिच्या हातावर फुंकर मारू लागतो. मात्र तो चुकीच्या हातावर फुंकर मारतो. यादरम्यान, अक्षरा त्याच्याकडे पाहतच बसते आणि मग त्याला मला त्या नाही या हाताला चटका लागल्याचे सांगते.

आणखी वाचा – Video : बायकोच्या आठवणीत अविनाश नारकरांचा चालत्या गाडीतच डान्स, व्हिडीओही केला शेअर, बायकोने दिले थेट उत्तर

मालिकेचा हा नवीन व्हिडीओ प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत असून या नवीन ट्विस्टही त्यांना आवडत आहे. दरम्यान, अधिपती-अक्षरा यांच्या नात्याला अजून घट्ट करण्यासाठी आजी ठरवते की, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे. अधिपती-अक्षराची खोली सजवण्याची तयारी आजी सुरु करते. ही गोष्ट जेव्हा भुवनेश्वरीला कळते तिचा संताप होतो. भूवनेश्वरी त्यांना वेगळं करण्याचा नवा कट रचताना दिसणार आहे.

Tags: marathi entertainment newsMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Kranti Redkar getting her nose pierced funny video shared on social media.

Video : नाक टोचून घेताना सोनाराच्या दुकानातच जोरजोरात ओरडली क्रांती रेडकर, शेवटी रडली अन्...; शेअर केला संपूर्ण व्हिडीओ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.