‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून् प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. आपल्या अभिनयासह तितीक्षा सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत राहत असते, सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने नुकताच तिच्या नवऱ्यावबद्दल म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ बोडकेबद्दलची एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता सिद्धार्थ बोडके हा नुकताच त्याच्या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘जेएनयू : जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ हा बॉलिवूड चगितरपट काल २१ जूनपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात सिद्धार्थने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याच चित्रपटाबद्दल व आपल्या नवऱ्याबद्दलची खास पोस्ट तितीक्षाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.
“माझ्या नवऱ्याला चंदेरी पडद्यावर बघताना” असं म्हणत तितीक्षाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती सिद्धार्थच्या शेजारी बसून त्याचा जेएनयू हा चित्रपट बघत आहे. तसेच या चित्रपटात त्याच्या एंट्रीला तितीक्षा आनंदाने ओरडत असल्याचेदेखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या व्हिडीओच्या खाली कॅप्शनमध्ये “आमचे स्वप्न आता फक्त एक स्वप्न राहिलेले नाही” असं म्हटलं आहे. तसेच तिने ‘जेएनयू’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्याचेही सांगितले आहे.
आणखी वाचा – सासरे तितीक्षा तावडेची मालिका बघतात पण सासूबाई नाही कारण…; अभिनेत्री म्हणाली, “क्वचितच कधीतरी…”
अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ चित्रपटात लहानशी भूमिका साकारल्यानंतर सिद्धार्थ आता ‘जेएनयू’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, अभिनेत्री तितीक्षा तावडे ही ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तर सिद्धार्थ बोडके महत्त्वाच्या भूमिकेत असणारा हा ‘जेएनयू’ चित्रपटातून् प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
आणखी वाचा – नेत्राच्या बाळाला मारण्याचा रुपालीचा पहिला प्रयत्न अयशस्वी, काय असेल विरोचकाची नवीन खेळी?
दरम्यान, ‘जेएनयू’ चित्रपटात सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत असून याशिवाय उर्वशी रौतेला, पियुष मिश्रा, रवी किशन, विजय राज, रश्मी देसाई, सोनाली सेवगल, अतुल पांडे व कुंज आनंद हे कलाकारही झळकणार आहेत. विनय वर्मा यांनी ‘जेएनयू’च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.