अभिनेत्री जुई गडकरी मराठी टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय चेहरा आहे. अभिनेत्रीची ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या यशाच्या शिखरावर आहे. मराठी मालिकांमध्ये नंबर १ असणाऱ्या या मालिकेची नायिका तिच्या वैयक्तिक आयुष्यात काय करते, हे जाणून घेण्याची उत्सुकता जुईच्या चाहत्यांना नेहमी असते. दरम्यान जुईदेखील तिच्या इन्स्टाग्रामवर वैयक्तिक आयुष्यातील विविध व्हिडिओ-फोटो शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने दत्तजयंतीनिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये ती दत्तसेवेत रमल्याचे पाहायला मिळत आहे. (Jui Gadkari shared Datta Jayanti Video)
जुई गडकरी आणि तिची दत्तभक्ती ही जगजाहीर आहे. जुईच्या घरी दत्तजयंतीनिमित्त मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते याबद्दल तिने अनेकदा अनेक मुलाखतींमधून भाष्यही केलं आहे, अशातच आता जुईने तिच्या सोशल मीडियावर या संपूर्ण दत्तजयंतीच्या उत्सवाची खास झलक शेअर केली आहे. यात ती दत्तगुरुंची मनोभावे पूजा करताना दिसत आहे. तसंच जुईने यावेळी आरती व भजनातही सहभाग घेतल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.
त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये जुई एका लहान मुलीला खेळवतानाचेही पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षीही तिने तिच्या भाचीला खेळवतानाचा खास व्हिडीओ शेअर केला होता. अशातच या वर्षीही जुईने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते आहे की, ती एका बाळाला अगदी प्रेमाने सांभाळते आहे आणि मागे भजनांचा आवाजही ऐकू येत आहे. अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ दत्त जयंतीच्या दिवशीचा असून, त्यावेळी त्यांच्याकडे भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आणखी वाचा – मृणाल दुसानिसला मालिकेत पाहताच क्षणी तिच्या लेकीची ‘अशी’ होती प्रतिक्रिया, म्हणाली, “माझा आवाज ऐकताच ती…”
दरम्यान, जुईने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच जुईच्या भक्तीसेवेचेही कौतुक केलं आहे. अनेकांनी या व्हिडीओखाली “श्री गुरुदेव दत्त”. “दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा”, “अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी ओम” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.