Monika Dabade Daughter Name Ceremony : काही दिवसांपूर्वीच ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री मोनिका दाभाडेने आई झाली असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. लग्नाच्या दहा वर्षानंतर मोनिका आई झाली असल्याचे समोर आलं. त्यामुळे मोनिकाने मालिकाविश्वातून ब्रेक घेतला. मार्च महिन्यात मोनिकाने चिमुकलीला जन्म दिला. याबाबत तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता यानंतर मोनिकाने तिच्या लेकीचं घरगुती पद्धतीने बारसं केलं. या नामकरण सोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. यावेळी अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
मार्च महिन्यात मोनिकाच्या घरी मुलीचं आगमन झालं. १५ मार्च २०२५ रोजी मोनिकाला कन्यारत्न प्राप्त झालं. यानंतर आता मोनिकाने तिच्या लेकीचं घरीच बारसं केलं आहे आणि सुंदर असं नाव ठेवलं आहे. मोनिकाच्या लेकीचं नाव वृंदा असं ठेवण्यात आलं आहे. “आमची ‘वृंदा’ म्हणजे पवित्र तुळस. तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि आशिर्वाद सदैव असुद्या”, असं कॅप्शन देत मोनिकाने तिच्या लेकीच्या नामकरण सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
यावेळी तिच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. अगदी घरच्या घरी आणि कुटुंबाच्या मदतीने हा सोहळा संपन्न झाला आहे. यावेळी मोनिकाने तिच्या लेकीचीही झलक शेअर केली. मोनिका सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. इतकंच नव्हे तर मोनिकाच स्वतःच असं युट्युब चॅनेलही आहे. ज्यावर ती अनेकदा व्लॉगिंग करताना दिसते. आई होणार असल्याची आनंदाची बातमी तिने इस्टाग्रामद्वारे दिली होती. यानंतर आता मोनिकाच्या लेकीच्या बारशाचे फोटो पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आणखी वाचा – भारतीय सैनिक पाकिस्तानी मुलीशी लग्न करु शकतात का?, प्रेम झालंच तर नियम व अटी नक्की काय?
मोनिकाच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी आणि चाहत्यांनी कमेंट करत लेकीच्या गोड अशा नावाचं कौतुक केलं आहे. आणि अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. आता मोनिका लेकीच्या लग्नानंतर पुन्हा ‘ठरलं तर मग’ मालिकेत केव्हा परतणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.