Hina Khan No Filter Photo : टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेली पाहायला मिळाली आहे. अनेक कार्यक्रमांना ती हजेरी लावत चर्चेत असते. काही महिन्यांपासून अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री नुकतीच एका गंभीर आजाराचा सामना करुन परतली आहे. अगदी धैर्याने तिने हा लढा देत आजारावर मात केली आहे. हिना खान कर्करोगाचा सामना करत होती. काही दिवसांपूर्वीच तिची या आजारावरील ट्रीटमेंट पूर्ण झाली असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच आजाराबाबतचे अपडेट देताना दिसली.
आजारपणाच्या या संपूर्ण प्रवासात हिना खानने स्वत: ला खूप सकारात्मक ठेवले आहे आणि धैर्य दाखवले आहे. ती चाहत्यांसह आपली प्रवास अद्यतने शेअर करत असते. अलीकडेच तिने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसह दक्षिण कोरियाला भेट दिली आहे. सोशल मीडियावरील हिनाच्या या सहलीचे फोटो व्हायरल होत आहेत. आता अभिनेत्रीने तिचा कोणताही फिल्टर फोटो शेअर न करता नो मेकअप लूक शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “नो फिल्टर. फक्त प्रेम”. हिनाच्या या फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

हिनाच्या समोर आलेल्या या फोटोमध्ये अभिनेत्री कोणत्याही मेकअपशिवाय दिसली. तिने यावेळी केसांना विगचाही वापर केला नव्हता, त्यामुळे तिचे मूळ केस आता वाढत असल्याचं समोर आलं आहे. तिच्या चेहऱ्यावरचे मोजके हास्य तिची आजारपणातून सुटका झाल्याचे भासवत होते. फोटोमध्ये ती नाईट ड्रेसमध्ये दिसली. हातात नजर लागू नये म्हणून तिने ब्रेसलेटही घातले आहे. या फोटोमध्ये हिनाने चाहत्यांना सकारात्मकता दर्शविली.
हिना खानला स्तनाचा कर्करोग आहे. तिने याबद्दल स्वतःच सोशल मीडियावर माहिती दिली आहे. हिना कर्करोगाचा उपचार घेत आहे. ती बर्याचदा फोटो, व्हिडीओ शेअर करुन तिच्या आरोग्याबाबत अपडेट देते. आजारपणादरम्यान हिनाने स्वतःचे केसही कापले. यानंतर, तिने केसांनी विगदेखील बनविला. आता हिना बर्याचदा केसांच्या विगमध्ये दिसत आहे.