Food Scam Viral Video : सध्या कामाच्या गडबडीत वा व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकदा ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्याचा कल अधिक वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर करण्याचा ट्रेंड कमालीचा वाढला आहे. घरी जेवण बनवायचा कंटाळा आल्यानंतर वा बाहेरच काही खायची इच्छा झाल्यानंतर अनेकजण स्विगी, झोमॅटोकडे वळतात. स्विगी, झोमॅटो मार्फत आपण आपल्याला हव्या त्या रेस्टोरंट वा हॉटेलमधून ऑर्डर करुन आपण घरबसल्या मागवू शकतो. अगदी सकाळी लागणाऱ्या दुधापासून ते जेवणापर्यंत सर्व काही ऑनलाईन ऑर्डर केले जाते. मात्र, जितकी ही ऑनलाईन सेवा सोयीस्कर आहे तितकीच ती घातकही आहे.
एखादे खाद्यपदार्थ ऑर्डर करताना विशेष काळजी घेणे फार आवश्यक आहे. ऑनलाईन जेवण ऑर्डर करताना तुम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंटचे रेटिंग तपासले पाहिजे. याबरोबर इतर लोकांनी लिहिलेले रिव्हू जरुर तपासावेत. कारण कधी कधी हॉटेल किंवा रेस्टॉरंटचे रेटिंग जास्त असते पण लोकांनी लिहिलेले रिव्हू त्या दर्जाचे नसतात. बऱ्याच वेळा आपण ऑर्डर केलेलं अन्न हे आपल्याला ह्या त्या ठिकाणाहून येतेय की नाही याचीही चौकशी करणे आवश्यक आहे.
आणखी वाचा – आमिर खानच्या लेकीला ओळखणंही झालं कठीण, लग्नानंतर वजन इतके वाढले की…; व्हिडीओ पाहून प्रेक्षकही अवाक्
दरम्यान, याच हॉटेलची पोलखोल करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. oye kiddan या नावं असणाऱ्या हॉटेलची पोलखोल करण्यात आली आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, एक मनुष्य हे हॉटेल नेमके कुठे आहे याचा शोध घेताना दिसत आहे. हे हॉटेल नसून एका वस्तीतील घरात हे पदार्थ बनवले जातात आणि उत्तम पॅकेजिंग करत हे पदार्थ मोठ-मोठ्या हॉटेलच्या नावे विकले जातात.
हा व्हिडीओ @akhilchitre यांच्या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या फसव्या हॉटेलची पोलखोल करत त्या माणसाने सांगितलं आहे की, “हॉटेल नाही काही नाही. एवढ्या आतमध्ये हे लोक काय विकतात, कसे विकतात. स्वीगीवरवर लोक ऑर्डर देणार. लोकांना असं वाटतं की, हे एखाद्या मोठ्या रेस्टारंटमध्ये वा हॉटेलमध्ये बनलेलं आहे. ग्राहकांना फक्त पॅकिंग चांगली दिसली की चालून जातं. पण यांना काय माहित हे कुठे आणि कसं बनवलं जात आहे. तर हे असं आहे. हॉटेल नाही आणि काही नाही. हॉटेलचे नाव आहे oye kiddan “. त्याने या महागड्या पदार्थांमागची सत्य परिस्थिती दाखवली आहे.