Sunita Ahuja Talks Aout Govinda Affair : बॉलिवूड अभिनेता गोविंदा अभिनयाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता त्याच्या वैयक्तिक नात्यामुळे चर्चेत राहिला आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्या नात्यात दुरावा आली असल्याची अनेक महिन्यांपासून बातमी कानावर येत आहे. दोघांच्या लग्नाला आजवर ३८ वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक अफवा सतत कानावर येत होत्या. त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं अशीही चर्चा होती. दरम्यान, त्यांच्या या नात्याबाबत गोविंदाची पत्नी सुनीता वेळोवेळी स्पष्टीकरण देताना दिसली. सुनीताने या चर्चा अफवा असल्याचं म्हणत फेटाळल्या. पण सुनीता यांनी गोविंदा आणि त्यांच्या नात्यात वाद सुरु असले तरी त्यांना कोणी वेगळे करु शकत नाही, असंही म्हटलं.
काही दिवसांपूर्वीच गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रींबरोबर अफेअर असल्याचा खुलासा त्याच्या पत्नीने मुलाखतीदरम्यान केला. यावेळी गोविंदा डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळालं. या सर्व चर्चांवर आता गोविंदाची पत्नी सुनीता हिने केलेलं भाष्य लक्ष वेधून घेत आहे. यावेळी गोविंदाचे अफेअर करण्याचे हे वय नाही, असं सुनीताने स्पष्ट केलं आहे.
एका व्हिडीओमध्ये सुनीता गोविंदाच्या अफेअरबद्दल बोलत आहेत. त्या म्हणाल्या की, “हो, मी ऐकलं आहे की हे होत आहे, ते होत आहे. पण या सर्व फालतू गोष्टी आहेत. हे अफेअर करण्याचं वय नाही. गोविंदा ६२ वर्षांचा आहे. आता त्याचं आजोबा व्हायचं वय आहे. टीनाचं लग्न करायचे आहे. नातवंड बघायची आहेत. हे सर्व करण्याची ही वेळ नाही”.
आणखी वाचा – करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात कार्तिकी गायकवाडचीच हवा, हळदीच्या ड्रेसपुढे नवरीही फिकी
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या लग्नाला ३८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी ११ मार्च १९८७ रोजी लग्न केलं होतं. त्यांना टीना आणि यशवर्धन ही दोन मुले आहेत. २०२५ च्या सुरुवातीला त्यांच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरल्या. तेव्हापासून गोविंदाच्या चाहत्यांमध्ये काळजीच वातावरण पाहायला मिळालं. त्यांचं ३८ वर्षांचं नातं तुटणार की काय ही भीती साऱ्यांना वाटू लागली. मात्र सुनीता यांनी त्यांना आणि गोविंदाला कोणीही वेगळं करु शकत नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.