Actor Madhav Vaze Passed Away : ज्येष्ठ अभिनेते, समीक्षक, प्राध्यापक माधव वझे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९५३ सालच्या ‘श्यामची आई’ चित्रपटातून माधव वझे यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांच्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते.यानंतर त्यांनी बालकलाकार म्हणून काही मोजके चित्रपट केले. ‘श्यामची आई’ या चित्रपटामुळं प्रकाशझोतात आलेले माधव वझे हे एक उत्तम नट होते. तसंच त्यांचा रंगभूमीचा अभ्याससुद्धा अतिशय दांडगा होता.
‘बापजन्म’, ‘3 इडियट्स’, ‘डिअर जिंदगी’, ‘एवढंस आभाळ’ अशा हिंदी, मराठी चित्रपटात ते झळकले. ‘हॅम्लेट’ या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन देखील केले होते. पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आणि इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. प्रायोगिक रंगभूमी, रंगमुद्रा, श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी, नंदनवन अशी पुस्तकं त्यांनी लिहिली.
आणखी वाचा – “भारत माता की जय”, ‘ऑपरेशन सिंदूर’वर कलाकारांच्या प्रतिक्रिया, म्हणाले, “घरात घुसून मारणार…”
‘श्यामची आई’ म्हटलं की समोर येतं ते म्हणजे साने गुरुजींचं पुस्तक आणि १९५३ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपटात. या चित्रपटात माधव यांनी बालकलाकार श्याम ही भूमिका साकारली होती. तर श्यामची आई म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री वनमाला यांनी भूमिका साकारली. माधव यांची भूमिका अजरामर झाली. आजपर्यंत त्यांना श्याम या भूमिकेतील नावानेच ओळखले गेले.आता प्रेक्षकांच्या मनातला श्याम हरपल्याने सर्वत्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आणखी वाचा – भारताकडून पाकिस्तानला करारा जवाब, मोहिमेला Operation Sindoor हे नाव का दिलं?, वाचा सविस्तर
कलाकारांकडून श्रद्धांजली
माधव वझेंच्या निधनानंतर मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारंनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. माधव यांच्या निधनाने सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.