आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना अचंबित करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या आयुष्यातही कधी कधी अचंबित होण्याची संधी मिळते. असच काहीस घडलंय महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील हास्य महारथी म्हणून जगभर प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेता समीर चौघुले (samir choughule) सोबत. प्रसिद्धी साठी काही काही माहिती लिहिणाऱ्यां बद्दल समीर ने एक खरमरीत पोस्ट केली आहे’.

काही न्यूज पोर्टल्सनी समीर चौघुले यांच्या सोबत फोटोस सोबत घरांचे काही फोटो शेअर केले आहेत. आपल्या आयुष्यात कधीही न पाहिलेल्या घरांचे फोटो फोटो पाहून समीरही चकित झाल्याचं दिसून आलं आहे. व्हायरल झालेले फोटो पोस्ट करत समीर म्हणाला आहे “माझ्या नसलेल्या मोठ्या घराचे फोटो ह्यांना कुठून मिळाले……जे अजून मी ही बघितले नव्हते….अरे बातम्या करायच्या म्हणून कोणाच्याही घराचे फोटो द्याल?..अशक्य थापाडी आहेत ही न्यूज पोर्टल्स……….”
====
हे देखील वाचा- सुबोधच्या ‘फुलराणीचं’ रूप अखेर प्रेक्षकांच्या भेटीला
====
कलाकाराला प्रसिद्धी सोबत कधी कधी अशा मानसिक मनस्ताप देणाऱ्या घटनांना सुद्दा सामोरे जावे लागते याचा प्रत्येय समीरच्या पोस्ट मधून येतो. कलाकाराला ही त्याचं पर्सनल आयुष्य आहे असं मत ही समीर ने वारंवार मांडलं आहे. जग्गू आणि ज्युलिएट, पोस्ट ऑफिस उघड आहे, बांबू समीरच्या भूमिका असणाऱ्या असेच मालिका आणि चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहेत.(samir choughule)