२१व्या शतकात जगत असतानाही हुंडाबळी सारखी प्रकरणं समोर येत आहेत. ही अतिशय धक्कादायक व लज्जास्पद बाब आहे. मनाप्रमाणे हुंडा न दिल्यामुळे सासरकडून होणारा जाच व छळाला कंटाळून आजही काही स्त्रिया स्वतःचं जीवन संपवतात. वैष्णवी हगवणे प्रकरण हे त्यातीलच एक आहे. दोन वर्षांपूर्वी वैष्णवीचं राजकीय क्षेत्रातील हगवणे कुटुंबातील मुलाशी तिचं लग्न झालं. लग्नात ५१ तोळे सोनं, एक फॉर्च्युनर आणि इतर महागड्या वस्तू देण्यात आल्या. इतकं देऊनही पुरलं नाही म्हणून वैष्णवीचा सासरच्या मंडळींकडून जाच सुरु झाला. अशातच वैष्णवीने टोकाचं पाऊल उचललं. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं बोललं जात आहे. आता पुन्हा एकदा असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका विवाहित स्त्रीचा हुंड्यामुळे बळी गेला आहे. (dowry death in pune)
पुण्यातील हुंडाबळीचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. हडपसरमधील सातववाडी परिसरात राहणाऱ्या दीपा प्रसाद पुजारीने राहत्या घरी गळफास घेतला. तिचं वय अवघं २२ वर्ष होतं. सासरच्या मंडळींना अपेक्षित असा हुंडा मिळाला नाही. त्यामुळे दीपाचा छळ सुरु झाला. या संपूर्ण प्रकरणाला कंटाळूनच तिने टोकाचं पाऊल उचललं. दीपाच्या वडिलांनी या संपूर्ण प्रकारानंतर तिच्या सासरविरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.
आणखी वाचा – सासू-सासरे, नणंद, दीराने मारत कपडे फाडले, कोणत्याही थराला जाऊन…; हगवणेंच्या मोठ्या सूनेचे धक्कादायक आरोप
दीपाचा पती प्रसाद पुजारी, दीर प्रसन्ना पुजारी, सासू सुरेखा पुजारी सासरे चंद्रकांत पुजारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपा व प्रसाद यांचं १८ एप्रिल २०२५मध्ये थाटामाटात लग्न झालं. अवघ्या महिन्याभरातच म्हणजे १९ मे २०२५ ला दीपाने आत्महत्या केली. सासरच्या मंडळींनी लग्नानंतर दीपाला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. दीपाला हा संपूर्ण त्रास सहनच झाला नाही. पण दीपाच्या माहेरच्यांनी लग्नात तिला हुंडा दिला होता. मात्र ते सासरच्या मंडळींना बहुदा कमी पडलं असावं.

लग्नात चार तोळं सोनं आणि १० लाख रुपये दीपाच्या सासरच्या कुटुंबियांना देण्यात आले. दीपाचं कुटुंबिय आणखी जास्त रक्कम व सोनं देईल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात त्यांनी परिस्थिती पलिकडे जाऊन काहीच दिलं नाही. याचाच राग पुजारी कुटुंबियांना होता. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच दीपाला त्रास देण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, लग्नात फ्रिज, भांडी आणि योग्य तो पाहुणचार केला नाही म्हणून पती प्रसाद व त्याच्या आईने भांडण केलं आणि शिवीगाळही केली. दीपाने घडलेला संपूर्ण प्रकार माहेरी सांगितला. छळ सहनच झाला नाही म्हणून ती माहेरीही निघून आली.
दीपा माहेरी निघून आल्यानंतर पुन्हा ड्रामा सुरु झाला. सासऱ्यांनी दीपाला समजावलं. तिला पुन्हा घरी घेऊन आले. सासरी परतल्यानंतर सगळं सुरळीत होईल असं बहुदा दीपाच्या घरातील मंडळींनाही वाटलं असावं. १८ मेला दीपाने न राहून वडिलांना फोन केला. पती, सासू, सासरे, दीर सगळ्यांकडूनच मारहाण व शिवीगाळ होत असल्याचं सांगितलं. वडिलांनी तिला एक शब्द दिला. पुण्यात येऊन मी सगळा वाद संपवतो असेही ते म्हणाले. मात्र वडिलांना फोन केला त्याच दुसऱ्या दिवशी दीपाने जीवन संपवलं.याच दुसऱ्या दिवशी दीपाने आत्त्म पुन्हा एकदा एका बापाने तिच्या मुलीला काही समजायच्या आतच गमावलं.