मराठ्यांच्या अजरामर शौर्य गाथांमध्ये काही महत्वाच्या कथा अजूनही अनुत्तरित आहेत असाच काही शौर्यगाथानांवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी चित्रपट सृष्टी दिवसेंदिवस बहरताना आपल्याला दिसते. अनेक वेगवेगळ्या विषयांवर होणारी चित्रपटांची निर्मिती समाज प्रबोधन करण्याचं काम करत आहेत. अशातच मराठ्यांचा गौरववण इतिहास सांगण्यासाठी ‘ बलोच ‘ या चित्रपटाची निमिर्ती करण्यात आली. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे.(Pravin Tarde Baloch)
गाजलेल्या युध्दांमधली एक लढाई आपण सगळ्यांनीच लहानपणा पासून ऐकली असेल ती म्हणजे ‘पानिपतची लढाई’. पानिपतच्या लढाईत मराठयांचा झालेला पराभव सुद्दा एक क्रांती होती असं म्हणणारा हा चित्रपट आहे.
हे देखील वाचा – म्हणून दादांनी लिहिलं ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…..’
पानिपतच्या लढाई नंतर बलुचिस्तान येथे मराठ्यांना गुलामी पत्करावी लागली. पानिपतची लढाई आणि पराभव ही मराठेशाहीसाठी जरी काळा दिवस असला तरी मराठी ही मराठ्यांच्या असीम शौर्याची गाथा आहे, जी ‘बलोच’च्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या मोशन पोस्टर मध्ये अभिनेते प्रवीण तरडे आणि अभिनेते अशोक समर्थ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.५ मे २०२३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Pravin Tarde Baloch)

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, ”बलोच ही एक सकारात्मक गोष्ट आहे. यापूर्वी आपण पानिपतबद्दल ऐकले आहे, ते केवळ पराभवाबद्दलच आहे. मात्र पानिपतच्या युद्धानंतर जेव्हा गुलामीच्या अवस्थेत असताना पुन्हा एकत्र येणे, संघर्ष करणे, ही गोष्ट प्रामुख्याने दाखवण्यात आली आहे. पानिपतचे युद्ध हे पराभव नसून शौर्य होते. हा चित्रपट पाहिल्यावर हा अभिमान प्रेक्षकांना जाणवेल आणि पानिपतकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी मला आशा आहे.’