मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. प्रथमेश हा त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला होता. अभिनेत्याने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह लग्नगाठ बांधली. प्रथमेशच्या शाही विवाहसोहळ्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. आता प्रथमेश सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. तर प्रथमेशची पत्नी क्षितिजाचा ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी वावर असलेला पाहायला मिळाला आहे. नेहमीच क्षितिजा तिचे रुटीन चाहत्यांबरोबर शेअर करते. प्रथमेश पाठोपाठ आता क्षितिजाचाही मोठा चाहतावर्ग असलेला पाहायला मिळतो. (Prathamesh Parab Wife Video)
नेहमीच अनेक व्हिडीओ बनवून ती चाहत्यांसह शेअर करते. अशातच सध्या मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसाबाबत क्षितिजाने शेअर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. क्षितिजाने पावसामुळे अंधार झाला असतानाही रेड अलर्ट असे का संबोधले जातात हा प्रश्न उपस्थित केला आहे. क्षितिजाचा हा विनोदी प्रश्न तिने या व्हिडीओमार्फत प्रेक्षकांना विचारला आहे. क्षितिजाचा हा मिश्किल अंदाज अनेकांना भावतो. तर काही वेळा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.
आणखी वाचा – “सून घराबाहेर पडली तरच…”, वैष्णवी हगवणेच्या दीराची पोस्ट व्हायरल, क्रुर कृत्य करतानाही असं काही बोलला की…

या रेड अलर्टवरुन प्रश्न उपस्थित करणारा व्हिडीओ क्षितिजाने शेअर करताच तिला एका नेटकऱ्याने कमेंट करत डिवचलं आहे. “जास्त डोकं नको लावू, तुला डोकं नाही आहे”, अशी कमेंट एका महिला नेटकऱ्याने केली आहे. यावर क्षितिजाने तिच्याच भाषेत तिला प्रतिउत्तर दिलं आहे. “ट्रोलिंग ही एक प्रतिभा आहे असे मानणाऱ्या व्यक्तीकडून ही कमेंट आली आहे. ही कमेंट मी माझं कौतुक म्हणून स्वीकारत आहे”. तर क्षितिजाने आणखी एक स्टोरी शेअर करत “दीदींना जोक आवडला नाही बहुतेक, पण तुम्हाला आवडू शकतो”, असं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर प्रथमेश व क्षितिजा बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. लग्नानंतर ही जोडी बरेचदा चर्चेत असलेली पाहायला मिळते. बरेचदा ते एकत्र फिरतानाही दिसतात.