शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ज्यांच्या घरातली स्त्री दु:खी…”, ‘धर्मवीर-२’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, प्रसाद ओकच्या ‘त्या’ संवादाने वेधलं लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 7, 2024 | 12:58 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prasad Oak's 'Dharmaveer-2' movie first teaser released know more.

“ज्यांच्या घरातली स्त्री दु:खी...", ‘धर्मवीर-२’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, प्रसाद ओकच्या ‘त्या’ संवादाने वेधलं लक्ष

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर गारुड घातले. अभिनेता प्रसाद ओकने या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही तूफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्याच्या दुसऱ्या भागाची चाहूल प्रेक्षकांना देण्यात आली होती. तेव्हापासून अनेक चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर-२’ची घोषणा करण्यात आली होती.

नुकतंच या चित्रपटाचे दुसरं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर हा सोहळा पार पडला. यावेळी अशोक सराफ, महेश कोठारे आणि बॉबी देओलदेखील उपस्थित होते. अशातच नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता प्रसाद ओकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे हा टीझर शेअर केला आहे. ‘ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की’ असं कॅप्शन लिहिलेल्या या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

हेही वाचा – गेली ४४ वर्षे करण जोहर देतोय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज, स्वत:च खुलासा करत म्हणाला, “यावर मात करण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण…”

या टीजरमध्ये एक मुस्लिम महिला राखी बांधायला आनंद दिघेंकडे येते. तेव्हा ते तिला बुरखा काढायला सांगतात. त्यानंतर ती महिला चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं त्यांना कळतं. यानंतर आनंद दिघे संतापतात आणि राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन ते त्या महिलेच्या घरी जातात. त्याचवेळी आनंद दिघे त्यांच्या खास शैलीत “ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की”  हा संवाद म्हणतात. अंगावर काटा आणणाऱ्या या टीझरमधून आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची झलक पाहायला मिळते.

हेही वाचा – बायकोबद्दल केलेल्या ‘त्या’ व्यक्तव्याचा अरमान मालिकला राग, रागाच्या भरात विशाल पांडेच्या मुस्काटात लगावली अन्…; आता ‘बिग बॉस’ काय निर्णय घेणार?

दरम्यान, ‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघेंचं जीवनचरित्र दाखवलं होतं. त्यानंतर आता ‘धर्मवीर-२’ मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार आहे. त्यामुळे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे.  पोस्टरमध्ये ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’ असा उल्लेख करण्यात आल्यामुळे या चित्रपटातून प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार? याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: Dharmaveer-2marathi entertainment newsmarathi movieprasad oak
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Next Post
Bhagya Dile Tu Mala fame Janhvi Killekar's mother had paralysis attack after the theft in the house, actress gave her mother's health update

घरात चोरी झाल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आईला आला होता पॅरालिसीसचा अटॅक, आईची प्रकृती कशी आहे? अभिनेत्री म्हणाली, “आता आई...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.