पहलगाम दहशतवादी हल्ला कधीच न विसरता येणारी घटना आहे. या हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांनी आपलं जीव गमावला. या घटनेला आता आठ दिवस उलटून गेले आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारकडून पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावलं उचलण्यात आली. त्याचबरोबरीने एक महत्त्वपूर्ण व कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला. तो निर्णय म्हणजे या हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत. राज्याच्या मंत्रीमंडळाची बैठक झाली. यामध्ये पीडित कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागतच. पण झालेलं मानसिक नुकसान, जवळचा माणूस गेल्याचं दुःख आयुष्यभर गाठीशी राहणार आहे. पहलगाम हल्ला ज्यांनी जवळून पाहिला ते पर्यटक अजूनही शांत झोपू शकत नसल्याचं समोर आलं आहे. (pahalgam terrorist attack survivor stories)
अजूनही शांत झोप नाही
पुण्याचे संतोष जगदाळे यांच्यावरही पहलगाम हल्ल्यात गोळीबार करण्यात आला. त्यांच्या पत्नीने तर ही संपूर्ण घटना सांगितली. मात्र हल्ल्याला आठ दिवस होऊनही जगदाळे कुटुंब शांत झोपलेलं नाही. याचबाबत एबीपी माझा वृत्त वाहिनीशी जगदाळे कुटुंबियांनी संवाद साधला. संतोष यांच्या पत्नी म्हणाल्या, “अजूनही आम्ही त्या धक्क्यामध्येच आहे. डोळे जरी बंद केले तरी मला रायफलवाला माणूसच दिसतो. मी या आठ दिवसांमध्ये झोपलेलीच नाही. पण लोकांनी आम्हाला या दिवसांमध्ये खूप पाठिंबा दिला आहे”.
आणखी वाचा – मुलांना कायमचं सोडून पाकिस्तानात गेलेली ‘ती’, मुलांच्या उपचारांपुढे हरलेला बाप अन् कायमचा भारताला रामराम
झोपेतही रायफल चालवल्याचा आवाज येतो
“आमचे आठ दिवस खूप भयानक होते. काल रविवार होता आज सोमवार आहे याची आम्हाला जाणीवच नाही. अजूनही आम्ही फायरिंगच्या दृश्यामध्येच अडकलो आहोत. त्यामधून बाहेर पडलेलोच नाही. मला तर एवढा मोठा धक्का आहे की, स्वतःला सावरुच शकत नाही. माझ्या मुलीला आश्वासनं मिळाली आहेत. त्या आशेवरच मी जगत आहे. कमीत कमी माझ्या मुलीचं तरी सरकार चांगलं करेल”.
आणखी वाचा – Video : सात मिनिट उशीर, बायको-मुलासह खड्ड्यात लपला, त्याने अल्लाह हू अकबर म्हणताच…; पर्यटक झिपलाईन करताना…
मेंदू बाहेर आलेला दिसतो “रात्री अडीच वाजता मी दचकून उठले. मला वाटलं समोर रायफल घेऊन कोणीतरी फिरत आहे. माझा नवरा, दीर खाली पडलेले, त्यांचा मेंदू कसा बाहेर आला हे माझ्या डोळ्यासमोरून अजूनही जात नाही”. तसेच संतोष यांची मुलगी असावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. मात्र तिनेही आमच्या भावनांशी कोणीच खेळू नका असं म्हटलं आहे. राजकारण्यांनाही भावनिक पद्धतीने कोणताच खेळ करु नका असं आव्हान केलं आहे.