Operation Sindoor : तमाम भारतीयांना ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो अखेर आलाच. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने बदला घेत न्याय मिळवून दिला आहे. पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त काश्मिरमधील (Pakistan-Occupied Kashmir) मधील नऊ ठिकाणी दहशतवाद्यांचे कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम त्यांनी फत्ते केली. रात्री सुमारे १.४४ च्या दरम्यान ही यशस्वी मोहीम लढून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं होतं. मात्र हे केवळ एका मोहिमेचे नाव नसून या नावामागे अनेक अर्थ दडल्याचे समोर आलं.
भारतानं मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव का दिले?
भारतीय सशस्त्र दलांनी या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले. पण हेच नाव या मोहिमेला का दिलं याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांचे हे प्रतीक आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेला भारतीय सैन्यदलाने ‘ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले होते. यावेळी महिला पर्यटकांऐवजी त्यांनी त्यांच्या पतींना लक्ष्य केले गेले आहे.
आणखी वाचा – “भारत माता की जय”, ‘ऑपरेशन सिंदूर’वर कलाकारांच्या प्रतिक्रिया, म्हणाले, “घरात घुसून मारणार…”
जेणेकरुन त्यांच्या मागण्या पूर्ण होऊ शकतील. यावेळी त्यांनी पुरुषांना त्यांच्या कुटुंबासमोर, पत्नीसमोर गोळ्या झाडल्या. या घटनेने भारतावर दुःखाचा डोंगर कोसळला. या निष्पाप मृत्यूचा बदला घेण्यासाठी भारताने ही ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली. या क्रूर कृत्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने जोरदार मोहीम राबवली. या नावामागे केवळ लष्करी संकेत नसून, दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा निर्धार होता. ज्या सिंदूराला त्यांनी लक्ष्य केले, त्याच सिंदूराच्या नावाने भारताने ही कारवाई केली ही कारवाई अत्यंत थेट आणि अचूक ठिकाणी होती.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं गेलं. महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या पतीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव ‘मिशन सिंदूर ठेवण्यात आले. भारतीय सैन्य दलाने या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना थडा शिकवला आहे. यापुढे दहशतवाद्यांनी कोणत्याही महिलेचे कुंकू पुसण्याची हिंमत केली तर ते युद्धासारखं मानलं जाईल हा स्पष्ट संदेश या प्रत्युत्तरातून देण्यात आला आहे.