छत्रपती शिवरायांचा इतिहास हा सदैव प्रत्येकाला प्रेरणा देणारा ठरला आहे. मराठी मातीत जन्मलेल्या प्रत्येक मुलाला जन्मतःच महाराजांच्या आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांचा इतिहास सांगितला जातो. अफझलखानाचा वध, पन्हाळ्याचा वेढा, आग्र्याहून सुटका, दक्षिण दिग्विजय यांसारख्या महाराजांच्या अनेक मोहिमा या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. इतिहासाच्या सुवर्ण पानांवर लिहिलेला आणखी एक क्षण म्हणजे ‘रायबाचं लग्न’.(subhedar poster)
रायबाच्या लग्नाची कथा इथे मांडण्याचं कारण असं कि ऐतिहासिक चित्रपटांचा वारसा जपणारे मराठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याची कथा रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहेत.
नरवीर तान्हाजी मालुसरे यांचं नाव ऐकलं कि एक वाक्य आपसूक समोर येत जे आजही रोजच्या जीवनात वापरलं जात ते म्हणजे “आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं”.
रायबाची लगीन सराई(subhedar poster)
इतिहासात सांगितल्या प्रमाणे सुभेदार तान्हाजी मालुसरे हे रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन महाराजांकडे गेले असता लग्न बाजूला ठेवून मोहीम निवडतात. या ऐतिहासिक क्षणावर ‘सुभेदार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील तान्हाजी मालुसरे यांच्या कुटुंबाच एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

या वरील पोस्टर मध्ये नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अभिनेते अजय पुरकर, शेलार मामा यांच्या भूमिकेत अभिनेते समीर धर्माधिकारी तर तान्हाजी यांचे बंधू सूर्याजी यांची भूमिका अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र साकारणार असल्याचं दिसतंय. तसेच प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टर नुसार सूर्याजी यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे, तान्हाजी यांच्या आईची भूमिका अभिनेत्री उमा सरदेशमुख साकारणार आहेत. ज्यांची लग्न सराई मालुसरे कुटुंबात सुरु आहे त्या रायबाची भूमिका बालकलाकार अर्णव पेंढारकर साकारताना पाहायला मिळतंय. तसेच सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळकर या पार पाडणार आहेत.(subhedar poster)
हे देखील वाचा – नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या स्मारक उभारणीसाठी दिग्पाल लांजेकर यांचा मदतीचा हात
ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.
दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.