Neha Kakkar Attends Driver Wedding : नुकत्याच झालेल्या मेलबर्न मैफिलीच्या वादानंतर गायक नेहा कक्कर तिचा पती रोहनप्रीत सिंग यांच्यासमवेत तिच्या ड्रायव्हरच्या लग्नात हजेरी लावताना दिसली. या लग्नात नेहा आणि रोहनप्रीतने खूप धमाल केली. लग्नातील समोर आलेल्या फोटो, व्हिडीओमुळे ते दोघेही चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत. यावेळी ती केवळ पाहुण्यांनाच भेटली नाही तर वधू -वरांचे अभिनंदन करताना दिसली. शिवाय या लग्नात नेहाने चाहत्यांनाही वेळ दिला. नेहा चाहत्यांसह सेल्फी घेतानाही दिसली. सध्या या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये नेहा कक्कर आणि रोहनप्रीत लग्नाच्या ठिकाणी प्रवेश करताना दिसत आहेत. नेहा कक्करला पाहून सर्व पाहुणे आनंदित झाले आणि तिला भेटण्यासाठी, तिच्याबरोबर सेल्फीसाठी धडपड करताना दिसले. त्यानंतर नेहा रोहनप्रीतसह स्टेजवर पोहोचली आणि वधू -वरांचे तिने अभिनंदन केले. यावेळी नेहाने वधूला जवळ घेतले त्यानंतर तिने खाली वाकून तिच्या पायाला स्पर्श केला. हे पाहून नेहाने ताबडतोब तिला उचलले आणि तिला मिठी मारली. नेहा कक्करचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते तिचे भरभरुन कौतुक करत आहेत.
नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले, ‘काहीही म्हणा, पण माणूस म्हणून ही खूप चांगली आहे”. तर एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, “हे जोडपे किती प्रेमळ आहे”. तर दुसर्याने लिहिले, “तुम्ही कितीही ट्रोल केले तरी ते खरोखर चांगले आहेत”. आतर आणखी एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, “प्रत्येक सेलिब्रिटी अशीच असावी, जी आपल्या कर्मचार्यांची काळजी घेते”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी
या कौतूकामध्ये काही नेटकऱ्यांनी नेहाला तिच्या कपड्यांवरुन टोकले आहे. “असे कपडे घालून लग्नात कोण जाते?”, असं म्हटलं आहे. तर काहीजण म्हणाले की, “नुकत्याच मेलबर्न मैफिलीत झालेल्या वादानंतर नेहा कक्कर हे सर्व प्रसिद्धी आणि प्रतिमा सुधारण्यासाठी करीत आहे”. यावेळी भाऊ टोनी कक्कर आणि आई यांच्यासमवेत नेहा कक्कर या लग्नाला उपस्थित होते. स्टेजवर पोहोचताना प्रत्येकाने वधू -वरांना आशीर्वाद दिला आणि अभिनंदन केले.