KRK On Muslims : चित्रपट समीक्षक केआरके प्रत्येक विषयावर आपले मत व्यक्त करण्यापासून स्वतःला कधीच रोखत नाहीत. त्याच्या वक्तव्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहिलेला पाहायला मिळाला आहे. अशातच केआरकेने भारत आणि पाकिस्तान युद्धावरही अनेकदा भाष्य करताना दिसला. भारत-पाकिस्तान तणावाबाबत तो नेहमीच वादग्रस्त विधान करताना दिसला. अशातच आता त्यांनी भारतात राहणाऱ्या मुस्लिमांबाबत पोस्ट शेअर करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. केआरकेच्या या पोस्टवर त्याला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. केआरकेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
केआरकेची व्हायरल पोस्ट
सध्या भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाने या संदर्भातील पोस्ट लगेचच नजरेस पडत आहेत. अशातच केआरकेने केलेल्या पोस्टमध्ये, “जे मुस्लिम भारतात आनंदी नाहीत, त्यांनी गाझामध्ये २२ लाख मुस्लिमांची स्थिती पाहिली पाहिजे. ज्यांच्याकडे घर, अन्न आणि पाणीही नाही. जे रस्त्यावर प्राण्यांसारखे मरत आहेत. जर तुम्ही भारतात राहत असाल तर तुम्ही सर्व खूप भाग्यवान आहात”. केआरकेची ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. केअरकेच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
Those muslims, who are not happy in India, should see the situation of 2.2 million Muslims in #Gaza, who are not having House, food and water also. Who are dying like animals on the roads. You all are lucky enough, if you are living in India.🇮🇳
— KRK (@kamaalrkhan) May 15, 2025
केअरकेच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट करत, “आपण देश का सोडला आणि पळून गेलात”, असं विचारलं आहे. त्याच वेळी, दुसर्याने एक कमेंट करत म्हटलं की, “आपण कधी भारतात जात आहात”. तर एकाने लिहिले की, “चांगली पोस्ट”. तर आणखी एकाने म्हटलं की, “आपण पुन्हा यूकेमध्ये काय करत आहात”. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या चार दिवसांनी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. जेव्हा रात्री आठ वाजतापंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार असल्याचं कळालं तेव्हा केआरकेने हे धोकादायक असल्याचे वर्णन केले होते. त्याने, “पुन्हा ८ वाजता?, हे ८ वाजता खतरनाक आहे”, असे म्हटलं.
केआरके बॉलिवूड कलाकारांना नेहमीच ट्रोल करत राहतो. जेव्हा जेव्हा एखाद्या मोठ्या कलाकाराचा एखादा चित्रपट येणार असेल तेव्हा तो त्यांना घालून पाडून सोडण्याची एकही संधी सोडत नाही. सलमान खान, आमिर खान किंवा सनी देओल या कलाकारांच्या चित्रपटाचे ते रिव्ह्यू देखील करतात आणि त्यांना अभिनयाविषयी धडेही देतात.