राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट आजही बॉलिवूडच्या जबरदस्त चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटातील ‘मुन्ना-सर्किट’च्या जोडीने अक्षरश: सर्वांना वेड लावले होते. त्यानंतर आलेल्या ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्येही ही जोडी गाजली. हिरानींच्या या चित्रपटात ‘मुन्ना-सर्किट’ची भूमिका अभिनेता संजय दत्त आणि अर्शद वारसी या दोघांनी साकारली आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटात ‘सर्किट’ हे पात्रच कधी नव्हतं, स्वत: निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी ‘सर्किट’ या पात्राबद्दलचा एक रंजक किस्सा सांगितला आहे. ‘सर्किट’ या पात्राऐवजी चित्रपटात ‘खुजली’ हे पात्र होते. मात्र ‘खुजली’ या पात्राऐवजी ‘सर्किट’ हे पात्र या चित्रपटात आले. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यातून निर्मात्यांनी ‘सर्किट’च्या भूमिकेचे कोडे उलगडले आहे. विधु विनोद चोप्रा यांनी ‘सर्किट’ या भूमिकेबद्दल व अभिनेता अर्शद वारसीबद्दल सांगितले आहे.
विधू विनोद चोप्रा यांनी खुलासा केला की, “चित्रपटात ‘सर्किट’ हे पात्रच नव्हते. सुरुवातीला पात्राचे नाव ‘खुजली’ होते. ‘सर्किट’ नव्हते. “आमच्या चित्रपटात जो ‘सर्किट’ होता तो कुठेच सापडत नव्हता. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सुरु होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी काही समस्या आल्या होत्या. आमचे शूटिंग सुरू होणार होते आणि राजू (राजकुमार हिरानी) खूप सभ्य मुलगा दिसत होता, आताही आहे. म्हणून मी त्याला आधी सांगितले होते की, तारखेबाबत काही अडचण आली तर ‘मुन्नाभाई एमबीबीएस’च्या एक-दोन आठवडे आधी त्याला बदला”.
यापुढे विधू विनोद चोप्रा यांनी अर्शद वारसी कसा सापडला हे सांगितले. याबद्दल ते म्हणाले की, “मी खरंतर पार्टीला गेलो होतो कारण संजय दत्तने खूप आग्रह केला होता. तेव्हा संजय दत्तसोबत एक लहान मुलगा नाचत होता. तेव्हा मी म्हटलं की तो कोण आहे त्याला शोधा. शोधल्यानंतर तो अर्शद वारसी निघाला आणि मग मी त्याला घरी बोलावलं”. यानंतर विधू विनोद चोप्रा यांनी खुलासा केला की, अर्शद वारसीनेच त्यांना ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील ‘सर्किट’ हे पात्र सुचवले होते.
याबद्दल बोलताना विधू विनोद चोप्रा यांनी असं म्हटलं की, “घरी आल्यानंतर अर्शदने मला भूमिकेबद्दल विचारले. तो म्हणाला, “माझी यात नेमकी भूमिका काय आहे”. आणि मी या भूमिकेबद्दल सांगून सांगून वैतागलो होतो. म्हणून मी त्याला म्हटलं की, “एक हिरो असतो आणि त्याचा एक चमचा असतो”. पुढे त्याने कपडे विचारले. तो म्हणाला “मी काळे कपडे घालतो. नंतर गळ्यात सोन्याची चैन घालतो” म्हटलं. यावर मी त्याला चालेल असं म्हटलं”. यापुढे अर्शदने म्हटलं की खुजली णाव मला आवडलं नाही. मी या पात्राचे नाव सर्किट ठेवतो” आणि अश्याप्रकारे ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये ‘सर्किट’ हे पात्र आले.