Mumbai Shocking News : सध्या देशभरात चिंतेचं वातावरण आहे. भारत-पाकिस्तान या दोन देशांतील वाढत्या तणावाने आता रौद्र रुप धारण केलं आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम आखली आणि यशस्वीही केली. एकीकडे आपला भारत देश अडचणीत असताना, या अडचणीचा सामना करत असताना एका घडलेल्या घटनेने कीव आली. हो. कोणत्याही परिस्थितीचं गांभीर्य नसणं याचं हे एक उत्तम उदाहरण. झालं काय तर केवळ आठ वर्षीय चिमुरडीवर विनयभंग. आपल्यातली माणुसकी पूर्णतः संपलीच आहे का?, हा प्रश्न आता गडद होत चालला आहे. भारत-पाकिस्तान लढ्यात सीमेवर आपले सैनिक अहोरात्र डोळ्यात तेल टाकून शत्रूंशी लढा देत आहेत ते असले चाळे करायला का?.
मुंबईतील ताडदेव परिसरात घरात घडलेली ही घटना. ४ मे रोजी आठ वर्षीय चिमुरडीवर विनयभंग आणि तो ही अगदी शेजारच्याच घरात. पिझ्झा देण्याच्या बहाण्याने आठ वर्षाच्या चिमुकलीवर घरी नेऊन तिचा विनयभंग केल्याचे प्रकरण सध्या साऱ्यांची घालमेल करवत आहे. मुंबईतील ताडदेव येथे राहणाऱ्या आठ वर्षीय मुलीला शेजारच्या मुलाने पिझ्झा देतो असं सांगून घरी बोलावलं. आणि अश्लील व्हिडीओ दाखवून तिचे कपडे काढत तिच्यावर विनयभंगाचा प्रयत्न केला.
घरी येताच पीडितेने तिच्याबरोबर घडलेला प्रसंग सांगितला तेव्हा आईच्या काळजाचं पाणी पाणी झालं. दुसऱ्याच मिनिटाला कसलाही विचार न करता त्या नराधमाला शिक्षा द्यायची हा विचार डोक्यात ठेवून पीडितेच्या आईने पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करत त्या नराधमाला तुरुंगात टाकलं. त्या चिमुरडीचा यांत काय दोष?, पिझ्झा मिळेल या आशेने ती त्या नराधमाच्या घरी गेली आणि त्याच्या तावडीत अडकली.
आणखी वाचा – अपघातानंतर पवनदीपवर पुन्हा शस्त्रक्रिया, आठ तास सुरु होतं ऑपरेशन, आता परिस्थिती अशी की…
आता आई-वडिलांनी शेजारच्यांकडेही मुलांना पाठवायचं बंद करायला हवं. सध्याच्या या जमान्यात स्वतःशिवाय कोणावर विश्वास तरी कसा ठेवायचा हा प्रश्न सतावतो. आज त्या चिमुरडीवर आणि तिच्या आई-वडिलांवर काय वेळ आली असेल याची कल्पनाही करवत नाही. मुलगी म्हटलं की तिला जपावं तितकं कमीचं. ताडदेव येथे घडलेली ही घटना अर्थात संतापजनक असून त्या नराधमाला योग्य ती शिक्षा मुंबई पोलीस मार्फत मिळेल अशी अपेक्षा पीडितेची आणि पीडितेच्या कुटुंबाची आहे.