Met Gala 2025 : सध्या जगभरात मेट गालाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील मेट गाला मध्ये बॉलिवूडमधील अनेक सिनेतारकांनी हजेरी लावत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यंदाच्या २०२५ च्या मेट गालामध्ये बॉलिवूड किंग शाहरुख खानने पदार्पण केले. याशिवाय लक्षवेधी बाब ठरली म्हणजे कियारा आडवानी. कियाराने या मेट गालाच्या रेड कार्पेटवर बेबी बंपसह हजेरी लावली. याशिवाय प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांज आणि इशा अंबानी यांच्या मेट गालातील खास लूकने साऱ्यांचं लक्ष वेधलं. सध्या मेट गालामध्ये बॉलिवूड सिनेतारकांची चांगलीच वर्दळ आणि चर्चा पाहायला मिळाली. आणि या कलाकारांचा जलवा पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय.
यंदाच्या न्यूयॉर्क येथील मेट गाला २०२५ मध्ये लवकरच आई होणाऱ्या कियारा आडवानीने बेबी बंपसह हजेरी लावली. यावेळी तिचा खास लूक साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होता. मेट गाला लूकमध्ये किनाराने गौरव गुप्ताने डिझाईन केलेल्या काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला होता. शिवाय ड्रेसचा पुढचा भाग गोल्डन रंगाने कव्हर केला आणि पांढऱ्या रंगाच्या ट्रेलने हा लूक पूर्ण केला. कियाराच्या या ड्रेसद्वारे तिच्या बेबी बंपवर गोल्डन हार्ट तयार केले होते. यावेळी कियारासह तिचा पती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही होता. संपूर्ण इव्हेंटमध्ये तो पत्नीची काळजी घेताना दिसला.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीने साधेपणाने केलं लेकीचं बारसं, नावंही ठेवलं फारच खास, अर्थही आहे…
तर यंदाच्या मेट गालामध्ये पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांजचा जलवाही पाहायला मिळाला. हा पहिलाच पंजाबी अभिनेता आहे ज्याने या मेट गालामध्ये सहभाग घेतला. याने साऱ्या हॉलिवूड कलाकारांना लूकमध्ये मागे टाकलं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. दिलजीत दोसांजने रेड कार्पेटवर पंजबी संस्कृतीचं प्रतिनिधित्व केलं. पटियालाचे महाराजा सर भूपिंदर सिंग यांच्यापासून प्रेरित होऊन अभिनेत्याचा हा खास लूक तयार करण्यात आला होता. दिलजीतचा हा शाही लूक बराच चर्चेत राहिला.
आणखी वाचा – पवनदीप राजनची अपघातानंतर वाईट अवस्था, आयसीयुमध्ये दाखल करताच…; डोक्यालाही गंभीर दुखापत
तर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने मेट गाला मध्ये हजेरी लावली. मेट गालामध्ये हजेरी लावणारा हा पहिला बॉलिवूड अभिनेता ठरला. भारतात नव्हे तर जगभरात बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या या अभिनेत्याला विदेशी मीडिया ओळखू शकली नाही याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी शाहरुखने पुढाकार घेत स्वतःची ओळख करून देत सब्यसाचीने हा लूक डिझाईन केला असल्याचं त्यांना सांगितलं.