Operation Sindoor : पहलगममधील दहशतवादी हल्ल्याचा आज ७ मे रोजी भारत सरकारने सूड उगवला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप भारतीय पर्यटकांना गोळ्या झाडल्या. यावर प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तान आणि पाकिस्तानने व्यापलेल्या जम्मू-काश्मीरमधील नऊ ठिकाणी भारत देशाने हल्ला करत प्रतिउत्तर दिलं आहे. भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केल्याचे सरकारने बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तथापि, या काळात कोणत्याही पाकिस्तानी लष्करी आस्थापनाला लक्ष्य केले गेले नाही. आता संपूर्ण देश अभिमानाने या क्रियेवर आनंद व्यक्त करत आहे. बॉलिवूड कलाकारांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दुपारी जम्मू आणि काश्मीर येथे खूप भयंकर आणि काळजाला तडा देणारे दृश्य पाहायला मिळाले. दहशतवाद्यांनी २६ पर्यटक ठार केले. या घटनेमुळे प्रत्येकजण हादरला. कुटुंबाबरोबर फिरायला गेलेल्या या पर्यटकांना त्यांचा शेवटचा दिवस असेल आणि असा मृत्यू असेल हे अपेक्षितही नव्हतं. संपूर्ण देश भारत सरकारकडून न्यायासाठी विनवणी करीत होता आणि शेवटी सरकारने भारतीयांना न्याय मिळवून दिला. अभिनेता रितेश देशमुख, अनुपम खेर, निमरत कौर, मधुर भंडारकर या कलाकार मंडळींनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि एक्स हँडलवर ट्विट केले आहे. आणि ‘भारत माता की जय’ असेही लिहिले आहे.
भारतीय सैन्याचा पाकिस्तान हल्ल्यानंतर कलाकारांच्या प्रतिक्रिया
Jai Hind Ki Sena … भारत माता की जय !!!! #OperationSindoor pic.twitter.com/OtjxdLJskC
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 6, 2025
अनुपम खेर, रितेश देशमुख यांनी “भारत माता की जय”, असं म्हणत हा आनंद व्यक्त केला आहे.
“भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले”, अशी पोस्ट कंगना रणौत यांनी शेअर केली आहे.
“आणि आता मात्र ज्यांना पोटात दुखेल, त्यांनी थेट माझा देश सोडून जावं घरातला आतंक आधी संपवायला हवा. मग बाहेरचा जय हिंद” अशी पोस्ट शेअर करत मराठी अभिनेत्री अदिती द्रविडने ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया दिली.
OPERATION SINDOOR: ZERO TOLERANCE TO TERROR
— Kangana Ranaut (@KanganaTeam) May 7, 2025
The Indian Armed Forces launched a precision mission, Operation Sindoor; 9 terror camps across Pakistan and Pakistan-occupied Jammu & Kashmir neutralized.#OperationSindoor #NewIndia pic.twitter.com/VpQ1OLdpka
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेता सुमीत पुसावळेने ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया दिली आहे. “यह नया हिंदुस्थान है, घर में घुस के मारेगा…” अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर अभिनेत्री मेघा धाडेने मानले पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. “धन्यवाद मोदीजी, धन्यवाद इंडियन आर्मी… भारत माता की जय! जय हिंद !! जय हिंद की सेना” अशी पोस्ट मेघाने शेअर केली आहे.
“पहलगाम हल्ल्यानंतर जनभावनेचा आदर करत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. सैन्याच्या या कामगिरीचा एक भारतीय म्हणून मला प्रचंड अभिमान वाटतो. यापुढेही दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत सरकारने कठोर पाऊले उचलावीत, जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही देशहितासाठी नेहमीच सरकार व सैन्यदलाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत” असं कॅप्शन देत अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जैश के ४, लश्कर चे ३ और हिजबुलचे २ आतंकी ठिकाण नेस्तनाभूत केली. मुझफ्फाराबाद, कोटली, गुलपूर, बिमर, सियालकोट, चक अमरू, मुरीडके, बहावलपूर (02) यांचा यांत समावेश आहे.