Ashish Kulkarni and Swanandi Tikekar Wedding : मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नसराई सुरू आहे. एकामागोमाग एक कलाकार आपल्या जोडीदाराबरोबर विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतंच ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे हे दोघे एकमेकांबरोबर लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यांच्या लग्नला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला. अशातच आता आणखी एका गायक-गायिका जोडी विवाहबंधनात अडकणार आहे आणि ही जोडी म्हणजे स्वानंदी टीकेकर व आशिष कुलकर्णी.
गेल्या अनके दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या आणि आता अखेर या चर्चाना पूर्णविराम लागला आहे. त्यांचा साखरपूडा झाल्यानंतर ही जोडी लग्न कधी करणार? याची त्यांच्या चाहत्यांसह साऱ्यांनाच उत्सुकता लागली होती आणि अखेर त्यांच्या लग्नाला सुरुवात झाली आहे. नुकताच त्यांचा मेहंदीसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. या सोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि आता त्यांच्या लग्नाआधीच्या विधींनादेखील सुरुवात झाली आहे.

आणखी वाचा – दिशा परमार व राहुल वैद्यच्या लेकीची पहिली झलक आली समोर, नाताळचं औचित्य साधत आईनेच मुलीचा चेहरा दाखवला आणि…
स्वानंदीने नुकताच तिच्या इन्स्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने आशिषबरोबरचा एक सेल्फी फोटो पोस्ट केला असून त्यावर तिने “या मुलाबरोबर (आशिष)बरोबर लग्न करायला आता आणखी वाट बघू शकत नाही” असं म्हटलं आहे. तसेच तिने या फोटोला ‘लग्नाआधीचे विधी’ असा हॅशटॅगदेखील दिला आहे. त्यामुळे स्वानंदी व आशिष यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. या फोटोमध्ये दोघेही कमालीचे सुंदर व आनंदी पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – ‘…म्हणून आम्ही कमेंट सेक्शन बंद केलं नाही’, पियुष-सुरुची स्पष्टचं बोलले, म्हणाले, “कोणाचंही सर्टिफिकेट नको…”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्वानंदी-आशिष यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. नंतर काही दिवसांनी अगदी दिमाखात त्यांचा साखरपुडादेखील संपन्न झाला होता. अखेरीस त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असून त्यांचे अनेक चाहते या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.