Aditi Sarangdhar Video : असे अनेक कलाकार जे बरेचदा प्रवासादरम्यानचे त्यांना आलेले अनुभव चाहत्यांसह शेअर करतात. सोशल मीडियावर ही कलाकार मंडळी नेहमीच हे विविध अनुभव पोस्ट करतात. बरेचदा कलाकारांना प्रवासादरम्यान वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावर ही कलाकार मंडळी व्यक्त होतात. अशातच आता मराठमोळी अभिनेत्रीने कॅब प्रवासादरम्यानचा अनुभव सोशल मीडियाद्वारे शेअर केला. यावेळी मात्र अभिनेत्रीला वाईट नाहीतर चांगला अनुभव आला आहे. ही अभिनेत्री म्हणजे मालिकाविश्वात आणि रंगमंच गाजवलेली अभिनेत्री अदिती सारंगधर.
अभिनेत्री अदिती सारंगधरने ‘वादळवाट’, ‘आभाळमाया’ यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर तिने नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अदितीने ‘हम बने तुम बने’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘लक्ष्य’, ‘उलाढाल’, ‘नवरा माझा भवरा’, ‘नाथा पुरे आता’ अशा अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलंय. उत्तम अभिनयाच्या बळावर अदितीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. नेहमीच अदिती सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर ती नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
आणखी वाचा – “रिऍलिटी शो स्क्रिप्टेड असतात”, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेंस लुईसचा मोठा खुलासा, म्हणाला, “टीआरपीसाठी…”
“मी या प्रतिभावान रॅपरला भेटले. माझा कॅब ड्रायव्हर. ब्राव्हो. पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा. ओला कॅब तुमच्याकडे हा प्रतिभावान मुलगा कॅब चालवत आहे”, असं कॅप्शन देत तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अदिती कॅबने प्रवास करताना दिसत आहे. या प्रवासात तिला चांगला अनुभव आला आहे. यांत अदितीने तिच्या कॅब ड्रायव्हरचा रॅप गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रवासात रॅप ऐकत असताना कॅब ड्रॉयव्हर रॅप गाताना दिसत आहे.
हे पाहून अदितीने याचा व्हिडीओ केला आहे आणि तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यांत अदितीने त्याचं भरभरुन कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ सध्या साऱ्यांच्या पसंतीस पडला असून या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.