Sharad Ponkshe On Trolling : सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे हे मराठी कलाविश्वातील असून त्यांनी अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. शरद पोंक्षे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्याचबरोबर ते सामाजिक किंवा राजकीय विषयांवर निर्भीडपणे भाष्य करतात. आपल्या व्यावसायिक तसंच खासगी आयुष्याबद्दल ते अनेक अपडेट देत असतात. याबरोबर सद्य परिस्थितीवर ते आपली मतं निर्भीडपणे ट्विटर, फेसबुकद्वारे मांडत असतात. शरद पोंक्षे यांची लेक पायलट झाली तेव्हा ते बरेच चर्चेत आलेले पाहायला मिळाले होते. लेक पायलट झाली ही आनंदाची बातमी त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत दिली, यानंतर त्यांना नेटकऱ्यांनी बरंच ट्रोल केलेलं पाहायला मिळालं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे आणि नेटकऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.
‘सर्व काही’ या युट्यूब वाहिनीशी साधलेल्या संवादात शरद पोंक्षे म्हणाले की, “मी माझ्या मुलीला अमेरिकेत कसं पाठवलं हे माझं मला माहीत आहे. मला कोणी विचारलं का? तू इतके पैसे कधी उभे केलेस? कसे उभे केलेस? तू यासाठी काही भ्रष्टाचार केलास का? तू दरोडा टाकून मुलीला पायलट केलंस का? नाही ना. २०२०-२१ मध्ये करोना आला. २०१९च्या डिसेंबरमध्ये करोना आला. ते पूर्ण वर्ष मी कर्करोगाशी झगडलो आहे”. यापुढे ते म्हणाले, “मी कर्करोगाशी लढा देत होतो. त्या काळात सगळं शून्यावर आलं होतं. माझं घर पूर्णपणे थांबलं होतं. थांबलेल्या घरावर येऊन करोना आणि लॉकडाऊन आदळला. त्यानंतर मी पूर्ण पैसे उभे केले. मी कर्ज काढलं. मी माझा एक फ्लॅट विकला. त्यानंतर मी माझ्या एफडी विकल्या असं करुन मी मुलीला पायलट होण्यासाठी अमेरिकेला पाठवलं. हे कुणाला माहीत आहे का?”
आणखी वाचा – करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात कार्तिकी गायकवाडचीच हवा, हळदीच्या ड्रेसपुढे नवरीही फिकी
यानंतर त्यांनी टीका करणा-यांबद्दल स्वतःच असं मत मांडलं. ते म्हणाले, “हे काही माहीत नसताना कमेंट्समध्ये उगाच काही तरी बोलत असतात. त्यात त्यांची नावेही वेगळीच असतात. आतासुद्धा माझी मुलाखत आल्यानंतर कमेंट्समध्ये बघितलं, ‘तर तू तुझ्या मुलीला अमेरिकेला पाठव आणि बहुजनांच्या मुलांना रस्त्यावर पाठव’ अशा अनेक कमेंट्स केलेल्या असतात, अरे याचा काय संबंध आहे का?”
आणखी वाचा – “पहिल्याच पावसात BMCची लायकी कळाली”, रस्त्यावरील कचरा पाहून भडकला मराठी अभिनेता, भयावह व्हिडीओ समोर
मध्यंतरीच्या काळ हा शरद पोंक्षे यांच्या कुटुंबियांसाठी अवघडच गेला होता. पोंक्षे यांना कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अतिशय खंबीरपणे त्यांना साथ दिली. अशा परिस्थितीत अभ्यास करुन त्यांच्या लेकीने बारावीच्या परिक्षेतही चांगले गुण मिळवले होते. त्यानंतर त्यांची लेक उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली होती. आणि आता ती पायलट झाली आहे.