रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : कुशल बद्रिकेने शेअर केला बायकोचा रियाज करतानाचा व्हिडीओ, म्हणाला, “मी मध्ये काही बोललो तर…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 16, 2024 | 11:34 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kushal Badrike shared a video of his wife doing riyaz of dance and he also written a funny caption

Video : कुशल बद्रिकेने शेअर केला बायकोचा रियाज करतानाचा व्हिडीओ, म्हणाला, “मी मध्ये काही बोललो तर...”

‘चला हवा येऊ द्या’ फेम कुशल बद्रिकेने सगळ्यांना खळखळवून हसवत, सर्वांचं मनोरंजन करत आपल्या अभिनय कौशल्याने प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं आहे. कुशल उत्तम अभिनेता तर आहेच शिवाय तो उत्तम लेखकही आहे असा म्हटलं तर वावगं होणार नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याची लिखाणशैली प्रेक्षकांसमोर मांडत असतो. अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कुशलचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तो चाहत्यांबरोबर काही ना काही शेअर करत त्यांच्या संपर्कात राहत असतो.

स्वत:बद्दलचे काही फोटो व व्हिडीओ शेअर करण्याबरोबरच अभिनेता त्याच्या बायकोबद्दलही काही खास फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याने त्याची बायको सुनयनाबद्दल एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. कुशलने सुनयनाचा एक व्हिडीओ शेअर करत त्याखाली मजेशीर कॅप्शनही लिहिलं आहे. त्याने लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

आणखी वाचा – रुपालीसह नेत्रालाही ऐकू आली ‘विचित्र वीणा’, हा देवीआईचा शुभसंकेत असेल की आणखी काही?, विरोचक सावध

कुशलची पत्नी सुनयनाही कथ्थक डान्सर असून या व्हिडीओमध्ये ती तिच्या डान्सचा सराव करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हाताच्या बोटावर डान्सच्या स्टेप्स मोजत असताना ती “एक दोन तीन चार” असं म्हणत आहे. तिच्या याच कृतीचा व्हिडीओ कुशलने शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ शेअर करत त्याने“यार…. एक दोन तीन चार पाच बोलायला रियाज कशाला हवा? पण मी मध्ये काही बोलत नाही उगाच आपला उपवास घडायचा” असं गंमतीने म्हटलं आहे.

आणखी वाचा – “ते अजूनही ऑफिसला सायकलने जातात”, ‘फादर्स डे’निमित्त प्रथमेश परबची वडिलांसाठी भावुक पोस्ट, म्हणाला, “जीवनशैली बदलली तरी…”

दरम्यान कुशलच्या या पोस्टखाली त्याच्या अनेक चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. एका नेटकऱ्याने “दादा, प्रयत्नही करु नकोस” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने “तू मध्ये न बोलण्याचा योग्य निर्णय घेतला आहेस” असं म्हटलं आहे. तसेच आणखी एकाने “उपवास की वनवास” असा मजेशीर प्रश्नही केला आहे.   

Tags: kushal badrikemarathi actormarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Paaru Serial Sharayu Sonawane
Entertainment

‘वाकडतोंडी’ म्हणत पारूबरोबरचा फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं महागात, कमेंट करत म्हणाली, “स्वतःच किती…”

जून 1, 2025 | 2:00 pm
Ashok Saraf
Entertainment

पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”

जून 1, 2025 | 10:00 am
Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Next Post
Appi Amchi Collector serial update finally Arjun and Amol have met new promo viral on social media

अखेर बाप-लेकाची भेट झाली, अमोलला भेटताच अर्जुन भावुक, कडकडून मिठी मारताच रडू लागला अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.