Saif Ali Khan Properties : लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खान फॉर्च्युन हाइट्स येथील त्याच्या जुन्या घरात शिफ्ट झाला आहे. आतापर्यंत तो सतगुरु शरण अपार्टमेंट इमारतीत राहत होता. पण इथेच १५ जानेवारीच्या मध्यरात्री अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. सैफ फॉर्च्युन हाईट्समध्ये शिफ्ट झाल्यापासून लोकांमध्ये त्याची चर्चा आहे. अभिनेत्याकडे भोपाळमध्ये १५ हजार कोटी रुपयांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे, जी त्याचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांची होती. हे एक पॅलेस आहे. सैफ नुकताच ज्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाला आहे तोच अपार्टमेंट आहे जिथे तो लग्नापूर्वी करीना कपूरबरोबर तो लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता.
सैफचे वांद्रे येथील अपार्टमेंट, जे सतगुरु शरण अपार्टमेंट नावाच्या इमारतीत आहे. येथेच सैफवर हल्ला झाला होता. लग्नाच्या काही वर्षानंतर सैफ व करीना या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले होते. या फ्लॅटची किंमत १०३ कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. आता सैफ करीना आणि मुलांबरोबर फॉर्च्युन हाइट्सवर शिफ्ट झाला आहे. दोघेही या अपार्टमेंटमध्ये ११ वर्षांपासून राहत होते. त्याची किंमत सुमारे ५० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

याच फॉर्च्यून हाइट्समध्ये सैफचे आणखी एक अपार्टमेंट आहे, जे त्याने २०१६ मध्ये सात कोटी रुपयांना खरेदी केले होते. हे ९५० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. सैफचे वांद्रे येथे आणखी दोन अपार्टमेंट आहेत, जे त्याने भाड्याने दिले आहेत. Zapkey.com नुसार, सैफने हे दोन अपार्टमेंट्स २०१५ मध्ये भाड्याने दिले होते. हे दोन्ही अपार्टमेंट हिकेन्स रेसिडेन्सी नावाच्या इमारतीच्या १२व्या आणि १३व्या मजल्यावर आहेत. या दोघांकडून दरमहा ३.२० लाख रुपये भाडे येते. सैफ व करिनाचेही स्वित्झर्लंडमध्ये आलिशान घर आहे. हे Gstaad मध्ये आहे, जिथे जोडपे दरवर्षी सुट्टीवर जातात. रिपोर्ट्सनुसार त्याची किंमत ३३ कोटी रुपये आहे.
सैफकडे पतौडी पॅलेस देखील आहे, जो त्याने नीमराना हॉटेल्सकडून ८०० कोटी रुपयांना परत विकत घेतला होता. हे १० एकरमध्ये पसरलेले आहे आणि १५० खोल्या आहेत. पतौडी पॅलेस हे गुरूग्राम, हरियाणात स्थित आहे, हे पतौडीचे आठवे नवाब इफ्तिखार अली खान यांनी बांधले होते, जे शर्मिला टागोर यांचे सासरे आणि मन्सूर अली खान पतौडी यांचे वडील होते. सैफच्या पतौडी पॅलेसची किंमत जवळपास ८०० कोटी रुपये आहे. आधी पतौडी पॅलेस नीमराना हॉटेल्सला भाडेतत्त्वावर देण्यात आला होता, पण नंतर सैफने ८०० कोटी रुपये देऊन तो ताब्यात घेतला. खुद्द सैफने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.