‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. बऱ्याच वर्षांपासून सुरु असलेल्या या मालिकेत अचानक सात वर्षांचा लीप आलेला पाहायला मिळाला. आणि लिपनंतर मालिकेला एक वळण आलेलं पाहायला मिळालं. मालिकेत सात वर्षांपूर्वी अर्जुन व अप्पीमध्ये आलेला दुरावा संपणार असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय वडिलांपासून दुरावलेल्या अमोलचीही अखेर सात वर्षांनी भेट झाली आहे. या मालिकेमुळे अभिनेता रोहित परशुराम म्हणजेच अर्जुन चर्चेत असतो. सोशल मीडियावरही रोहित बऱ्यापैकी सक्रिय असतो. (rohit Parshuram Lovestoty)
नुकतीच ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेची टीमने ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी आदेश बांदेकर यांनी मालिकेतील कलाकारांची चांगलीच पोलखोल केलेली पाहायला मिळाली. यावेळी रोहितनेही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत ऑनस्क्रीन भाष्य केलेलं पाहायला मिळालं. यादरम्यान आदेश यांनी रोहितला खऱ्या आयुष्यातील त्याची अप्पी त्याला कुठे मिळाली?, असा सवाल केला. या प्रश्नाचे उत्तर देत रोहितने त्याच्या लव्हस्टोरीबाबत भाष्य केलं.
याबाबत बोलताना रोहित म्हणाला, “माझ्या बायकोच नाव पूजा आहे. आम्ही डिग्रीपासून एकत्र आहोत. भोरला आम्ही शिक्षण घेत होतो तिथेच आमची ओळख झाली. ती मूळची नाशिकची आहे. पण त्यांचं कुटुंब ठाण्यात राहतं. एकाच वर्गात असताना रोल नंबर १ मी आणि रोल नंबर २ ती. आधी कॉलेज पार्टनर, मग प्रॅक्टिकल पार्टनर आणि मग लाईफ पार्टनर”, असं म्हणत रोहितने पूजाच्या भेटीबाबत भाष्य केलं.
अगदी कॉलेजपासून सुरु झालेली ही मैत्री आणि या मैत्रीचं प्रेमात झालेलं रूपांतर रोहित व पूजाच्या लव्हस्टोरीमध्ये पाहायला मिळतं. रोहित परशुरामच्या पत्नीचे नाव पूजा लक्ष्मण आव्हाड असं आहे. एक मॉडेल म्हणून पूजा ओळखली जाते. पूजा मुळची नाशिकची असून तिने पुण्यात शिक्षण घेतले आहे. तिला सुरुवातीपासूनच मॉडलिंगमध्ये रस होता. त्यामुळे तिने याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत तिने अनेक पारतोषिकेही जिंकली आहेत. २०१८च्या ‘मिस्टर इंडिया वर्ल्ड वाईड’च्या अंतिम फेरीपर्यंतही तिने मजल मारली होती.