अभिनेता करण ओबेरॉय एकेकाळी टीव्हीवरील त्याच्या भूमिकांमुळे चर्चेत राहिला. ‘बँड ऑफ बॉईज’ या संगीतमय बँडमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अभिनेत्याने २०१९मध्ये तुरुंगवास भोगलेल्या वेळेबद्दल खुलासा करत भाष्य केलं आहे. करणवर बलात्कार व खंडणीचा आरोप असून त्याला एका महिन्याहून अधिक काळ कोठडीत ठेवण्यात आले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करणने सांगितले की, जेव्हा तो या टप्प्यातून जात होता, तेव्हा त्याला या आयुष्याचा कंटाळा आला होता. आणि एकावेळी अशी आली की त्याने तुरुंगात जवळपास मरणाला हात लावला. अभिनेत्यावर अद्याप खटला सुरु आहे. (karan oberoi statement)
सिद्धार्थ कन्ननशी झालेल्या संवादात करण ओबेरॉयने सांगितले की, तुरुंगात असताना त्याला शौचालय स्वच्छ करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. करण म्हणाला, “हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा होता. हे माझ्यासाठी नरकात जाण्यासारखे होते. मी इथे कसा आलो हे मला कळत नव्हतं. माझ्या आजूबाजूला असे लोक होते ज्यांनी अनेकांना मारले होते. माझे संरक्षण करणारे काही गुन्हेगार होते”.
करणने सांगितले की, “जेव्हा तो तुरुंगात पोहोचला तेव्हा त्याने काही दिवस जेवणही केले नाही. आणि त्याला नीट झोपही येत नव्हती. दरम्यान तो आजारी पडला आणि बेशुद्धही पडला. तो म्हणाला. “जेव्हा आपल्याला माहित नसतं की आपण उद्या जगू की नाही या परिस्थितीतून मी जात होतो. मी पहिले सात दिवस काहीही खाल्ले नाही. पहिले नऊ दिवस मी झोपलोही नाही. मी अस्वस्थ होत होतो. त्या बेशुद्ध अवस्थेत कदाचित मी मरेन असे मला वाटू लागले होते”. तो पुढे म्हणाला, “एकदा माझा गुदमरुन मृत्यू झाला होता. मला त्यावर चर्चा करायची नाही पण मला वाटले की हा शेवट आहे, मला माझे आयुष्य माझ्या डोळ्यांसमोर दिसत होतं. मला क्लॉस्ट्रोफोबिया आहे आणि त्यांनी मला एका अंधारकोठडीमध्ये ठेवले. तेव्हा मला वाटले की, हा माझ्या आयुष्याचा शेवट आहे”.
करण ओबेरॉयवर २०१९मध्ये बलात्कार व खंडणीचा आरोप होता. जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत बलात्कार झाल्याचा दावा एका महिलेने केला असून अभिनेत्याने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते, असं समोर आलं. यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला अटक करण्यात आली. एका महिन्यानंतर अभिनेत्याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला. तो तुरुंगात असताना, महिलेने मारहाणीचा दुसरा एफआयआर दाखल केला आणि दावा केला की, तिला तिची तक्रार मागे घेण्याची धमकी देण्यात आली होती. गुन्हेगारी कट रचणे आणि एफआयआरमध्ये खोटी माहिती दाखल केल्याच्या आरोपाखाली त्याला मुंबई पोलिसांनी नंतर अटक केली. २०२३ मध्येही त्याला २०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. करणही अभिनेत्री मोना सिंगबरोबर बराच काळ रिलेशनशिपमध्ये होता. त्याने सांगितले की, तिला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे म्हणून ते वेगळे झाले.