स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका नेहमी तिच्या हटके कथानकाने चाहत्यांचं लक्ष वेधते. मालिकेने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं असून या मालिकेतील प्रत्येक कलाकाराविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. या मालिकेतील गौरी-जयदीपची जोडी तर चाहत्यांची आवडती जोडी बनली. यासोबतच या मालिकेतील शालिनी आणि मल्हार या जोडीला देखील चाहते पसंती देतात.या मालिकेत आता साईशा साळवी म्हणजे गौरी-जयदीपची मुलगी लक्ष्मी देखील पाहायला मिळते.मालिकेतील कलाकारांमध्ये ऑनस्क्रिनप्रमाणे ऑफ स्क्रीनदेखील बॉण्ड पाहायला मिळतो. तर या मालिकेतील सेटवरील असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.(Laxmi Malhar)
मालिकेत मल्हार म्हणजे अभिनेता कपिल होनराव याने एक bts व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्याची नवी हेअरस्टाईलिस्ट पाहायला मिळते .तर ही हेअरस्टाईलीश दुसरी तिसरी कोणी नसून मालिकेतील लक्ष्मी आहे. व्हिडिओत लक्ष्मी मल्हारच्या केसांना वळण देताना दिसते. my new hairstylist आक्का लक्ष्मी… असा त्रास देते ही मला सेटवर असा कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांनी देखील पसंती दिली.तर मल्हार हा नेहमी लक्ष्मीसोबत धमाल मस्तीचे व्हिडीओ शेअर करत असतोच.त्यांच्या या व्हिडिओवर सर्वचजण प्रेमाचा आणि हास्याचा वर्षाव करत असतात.

मल्हार ही भूमिका साकारणारा अभिनेता कपिल होनराव मालिकेमुळे वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. कपिल रसिकांचा लाडका अभिनेता बनला आहे. सोशल मीडियावरही तो सक्रीय असतो. फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. सोशल मीडियावर प्रचंड मोठा त्याचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. याशिवाय लक्ष्मीचा देखील सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असलेला पाहायला मिळतो. ती सेटवर देखील नेहमी कल्ला करताना दिसते.(Laxmi Malhar)
हे देखील वाचा – समीरने रसिकाला दिली कौतुकाची भेट
सध्या मालिकेत सुरु असलेल्या ट्रकमध्ये देखील मंगल मावशी शालिनी आणि गौरीची परीक्षा घेताना दिसतात. तर आता यात कोण पास होणार हे पाहण्यासाठी देखील चाहते उत्सुक झालेत.
