Kaafi Victim Of Asid Attack : वयाच्या तिसऱ्या वर्षी अॅसिड अटॅक, दृष्टी जाणं या सगळ्याचा एका मुलीने कसा सामना केला असेल याचा विचारही न केलेला बरा. इतका कठीण प्रवास, इतक्या वेदना सहन करुनही जी मुलगी हिंमत न हारता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवत शाळेची टॉपर बनते तिचं कौतुक करावं तितकं कमीच. अर्थात इथवरचा हा प्रवास काही सोप्पा नाही. खूप मेहनतीच्या जोरावर, कुटुंबाच्या साथीने काफी नामक मुलीचा संघर्ष अगदी वयाच्या तिसऱ्या वयापासूनच सुरु झाला. शाळा शिकण्याची, मोठं होऊन आयईएस ऑफिसर बनण्याची त्या मुलीची जिद्द तिला काही शांत बसू देत नव्हती. आणि तिने तिच्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करत देशात स्वतःच नाव कोरलं.
हिसारच्या बुधाना गावात राहणाऱ्या या काफीवर वयाच्या तिसऱ्या वर्षी शेजारच्या तीन लोकांनी ईर्षेमुळे होळीच्या दिवशी अॅसिड फेक केली. यामुळे ती आंधळी झाली होती आणि तिचे संपूर्ण तोंड आणि हात वाईट रीतीने जाळले गेले होते परंतु यांत तिने वा तिच्या कुटुंबाने कुठेही हार मानली नाही. काफीने अभ्यासाची सुरुवात प्रथम गावातूनच सुरु केली. सहाव्या इयत्तेत असताना तिने चंदीगडमधील ब्लाइंड स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि तिने परिश्रमपूर्वक अभ्यास करण्यास सुरवात केली.
आणखी वाचा – “सासूबाईंमुळे एकत्र राहतो नाहीतर…”, गोविंदाच्या बायकोचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “कोणाची नजर लागली आणि…”
काफीने शाळेद्वारे प्रदान केलेल्या ऑडिओ बुकसह शिक्षण घेतले आणि बारावीमध्ये ९५.६० टक्के गुण मिळवले. ती एक शाळेची टॉपर बनली आहे. तिने दहावीतही ९५.२० टक्के गुण मिळवले. १७ वर्षीय ही काफी म्हणाली की, तिला आता दिल्ली विद्यापीठातून राजकीय विज्ञान या क्षेत्रात अभ्यास करायचा आहे. काफीचा येथे पोहोचण्याचा प्रवास इतका सोपा नव्हता असेही तिने सांगितले. वडील चंदीगडमधील मिनी सचिवालय हरियाणात नोकराचे काम करत आहेत.
काफीवर जळत्या ऍसिडचा हल्ला झाला ज्याने तिची संपूर्ण दृष्टी गेली. शिवाय, जळत्या अॅसिडमुळे काफीचे हातपायही जळाले. त्यावेळी उपचारासाठी काफीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांना तिला वाचवण्यात यश आले मात्र तिची दृष्टी ते वाचवू शकले नाहीत. तर समोर आलेल्या माहितीनुसार ज्यांनी तिच्यावर अॅसिड अटॅक केला आहे तो अजूनही मुक्तपणे फिरत आहे.