Indias Got Latent : रणवीर अलाहाबादिया हे प्रकरण अजूनही निवळलेलं नाही. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहाबादीयाने केलेल्या अश्लील वक्तव्याने हा वाद पेटला आहे. रणवीर अलाहाबादियाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. वास्तविक रणवीर पोलिसांच्या संपर्कात नसल्याचं समोर आलं आहे. असे सांगितले जात आहे की, त्याचा फोन देखील बंद आहे आणि तो घरातून बेपत्ता झाला आहे. त्याच वेळी, जेव्हा गुरुवारी संध्याकाळी मुंबई पोलिस रणवीरच्या घरी गेले, तेव्हा घराला कुलूप होतं. माहितीनुसार, रणवीर किंवा त्याचे वकील मुंबई पोलिसांशी संपर्क साधत नाही आहेत. मुंबई पोलिसांनी रणवीरला समन्स दिले आहेत आणि त्याचे निवेदन रेकॉर्ड करण्यासाठी रणवीरला पोलिस स्टेशनमध्ये येण्याची वाट पाहत आहेत.
पण आता रणवीर आपला फोन बंद करुन बेपत्ता झाला आहे. मुंबई पोलिसांकडून रणवीरला दोनदा समन्स पाठवला आहे. इंडिया गॉट लेटेंट या शोचे व्हिडीओ एडिटर प्रथम सागर खार पोलिस स्टेशनवर पोहोचला आहे आणि त्यांचे निवेदन रेकॉर्ड केले जात आहे. अलीकडेच रणवीर युट्युबरने रैनाच्या ‘इंडिया गॉट लेटंट’ या शोला न्यायाधीश म्हणून उपस्थित लावली होती. हा एक डार्क कॉमेडी शो आहे. ज्यामध्ये रणवीरने पालकांवर केलेल्या कमेंटबद्दल खूप वाईट प्रतिक्रिया येत आहेत.
आणखी वाचा – ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्रीचा थाटामाटात साखरपुडा, संगीत सोहळ्यातही नवऱ्यासह बेभान होऊन नाचली, व्हिडीओ समोर
रणवीर तसेच समय रैनाच्या विरोधात एफआयआर नोंदविला गेला आहे. सध्या ही बाब सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. शुक्रवारी, कोर्टाने त्वरित सुनावणी करण्यास नकार दिला, असे सांगून किरणवीर यांच्या याचिकेवर काही दिवसांत सुनावणी होईल. रणवीर एक प्रसिद्ध YouTuber आहे. दरमहा तो लाखो रुपयांची कमाई करतो. रणवीरकडे स्वतःच पॉडकास्ट चॅनेल देखील आहे. आतापर्यंत बरेच मोठे कलाकार त्याच्या चॅनेलवर आले आहेत.
आणखी वाचा – प्रतीक बब्बर दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात, पत्नीसह शेअर केलेल्या फोटोंनी वेधलं लक्ष, अभिनेता भावुक
सोशल मीडियावर रणवीरला लोक प्रचंड ट्रोल करत उपदेशाचे डोस पाजत आहेत. ‘इंडिया गॉट लेटेंट’मध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला प्रश्न विचारला की तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल? त्याच्या या प्रश्नावर समय रैनाने सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न असल्याचे म्हटले. रणवीरच्या याच प्रश्नामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.