Madhuri Dixit Beauty Tips : धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा जगभरात खूप मोठा चाहतावर्ग आहे. आजवर माधुरीने तिच्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केलं. तर वयाची ५७ वर्ष पूर्ण केलेल्या माधुरीच्या सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. माधुरीची एक झलक पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली आहे. माधुरीचे सौंदर्य तिच्या वयानुसार आणखी वाढत असल्याचं दिसतंय. अभिनेत्रीच्या या वाढत्या सौंदर्याचे रहस्य प्रत्येकालाच जाणून घ्यायचे आहे. आणि या वाढत्या सौंदर्यासाठी माधुरी नेमके काय उपचार करते हे तिच्याकडून समजणं म्हणजे ‘सोने पे सुहागा’ म्हणायला हवं.
हो. या सुंदर त्वचेमागचं रहस्य, सौंदर्यात वाढ होण्यामागचं रहस्य नेमकं काय आहे, यासाठी ती स्वतः कोणत्या टिप्सचा वापर करते याबाबत स्वतः माधुरीने व्हिडीओ स्वरूपात सांगितलं आहे. वयाच्या 50 व्या वर्षानंतरही सुंदर आणि निर्दोष त्वचा कशी मिळवता येईल यासाठी स्वतः माधुरीने दिलेल्या या टिप्स जाणून घ्यायला विलंब करु नका. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये माधुरी म्हणाली की, जेव्हा जेव्हा आपल्याला आपला चेहरा थकलेला वाटत असेल किंवा थोड्या वेळात आपल्याला घराबाहेर जायचे असेल तेव्हा ही कृती नक्कीच फायदेशीर ठरेल. यासाठी, आपल्याला फक्त दोन गोष्टी आवश्यक आहेत.
आणखी वाचा – CID मधील नवा एसीपी प्रेक्षकांना पटेना, सीन पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, “सर्वात वाईट अभिनय…”
सामग्री
काकडी- १
दूध- १ वाटी
कृती
प्रथम आपण एक काकडी घ्या आणि गोल आकारात पातळ कापांमध्ये कापून घ्या. आता त्यांना एका वाडग्यात दुधात भिजवा आणि थंड होण्यासाठी हे भांड १० ते १५ मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा ते थंड होईल तेव्हा आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर दुधाने भिजलेल्या काकडीचे तुकडे चिकटवा. असे करताना शक्यतो झोपा कारण लक्षात ठेवा जेणेकरुन काकडी खाली पडू नयेत. आणि या काकडी १५ मिनिटे तोंडावर ठेवा आणि वेळ पूर्ण झाल्यानंतर, थंड पाण्याने तोंड धुवा. आपण आपले तोंड धुताच आपल्या चेहऱ्यावर एक निराळीच चमक पाहायला मिळेल.
माधुरी दीक्षितने चेहरा सुधारण्यासाठी एक अतिशय प्रभावी चेहरा कसा बनवायचा हे स्पष्ट केले आहे. ही कृती तिची आवडती आहे. ही कृती ती स्वतःही करते. चेहरा सुंदर बनविण्यासाठी आपल्याला तीन गोष्टींची आवश्यकता आहे.
सामग्री
पावडर ओट्स- १ चमचे
मध- १ चमचे
गुलाब पाणी- १ चमचे
कृती
सर्व प्रथम एक चमचे ओट्स पावडर, एक चमचे मध आणि एक चमचे गुलाबाचे पाणी एका वाडग्यात मिसळा आणि त्यास चांगले मिक्स करा. त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर तयार केलेले सारण लावा आणि ते १५ मिनिटे कोरडे होईपर्यंत ठेवा. १५ मिनिटे झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि नंतर आपली त्वचा कशी चमकू लागते ते पहा.
टीप : लेखात दिलेल्या प्रिस्क्रिप्शनची माहिती आणि दावे पूर्णपणे इंस्टाग्रामवर प्रकाशित केलेल्या व्हिडीओवर आधारित आहेत. इट्स मज्जा याच्या सत्य, अचूकता आणि परिणामाची जबाबदारी घेत नाही. कोणत्याही प्रकारच्या प्रिस्क्रिप्शनचा प्रयत्न करण्यापूर्वी, कृपया एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.