Dipika Kakar Health Update : टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीची तब्येत बिघडली असल्याचं तिने आणि तिच्या पतीने सांगितलं. अभिनेत्रीच्या डाव्या यकृतामध्ये ट्यूमर सापडला आहे. दीपिकाच्या शस्त्रक्रियेची तयारी सुरु असताना, तिला तीव्र ताप आला आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा नवरा शोएब इब्राहिम म्हणाला की, तापामुळे शस्त्रक्रिया लांबणीवर गेली आहे. दीपिकाचे चाहते तिच्या आरोग्याबद्दल काळजीत आहेत. आता, शोएबने एक पोस्ट शेअर करत दीपिकाच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे. दीपिकाचा ताप नियंत्रणात आहे आणि ती घरी परतली आहे, असं शोएब म्हणाला.
जर सर्व काही योजनेनुसार झाले तर पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया होईल, असे तो म्हणाला होता. त्याने सर्वांना विनंती केली की, दीपिका कक्करसाठी प्रार्थना करा. शोएब इब्राहिम यांनी शुक्रवारी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली, ज्यात चाहत्यांना दीपिकाच्या आरोग्याबद्दल सांगण्यात आले. त्याने लिहिले की, “तुम्हाला दीपिकाच्या आरोग्याबद्दल अपडेट देण्यासाठी ही पोस्ट लिहिली आहे. तिचा ताप आता नियंत्रणात आहे आणि ती घरी परत आली आहे. जर सर्व काही योजनेनुसार घडले तर पुढच्या आठवड्यात तिच्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. कृपया दीपिकासाठी आपली प्रार्थना सुरु ठेवा”.
आणखी वाचा – गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका, १५ मिनिटं हृदय बंद, तरीही जिवंत असलेला ‘तो’ नक्की कोण?, काळ आला होता पण…
बहिणीच्या मुलासाठी प्रार्थना
याशिवाय त्याने आपल्या चाहत्यांना आपली बहीण सबा इब्राहिम आणि तिच्या नवजात मुलाला आशीर्वाद देण्यास सांगितले. शोएबने लिहिले, “जसे आपणा सर्वांना माहित आहे की सबा आणि खालिद यांना बाळ झाले आहे आणि आशीर्वाद मिळाला आहे. कृपया नवजात बालकाला आणि सबालाही आशीर्वाद द्या”.
आणखी वाचा – Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं
या महिन्याच्या सुरुवातीस, शोएब इब्राहिमने उघड केले होते की, गेल्या काही आठवड्यांपासून दीपिकाला पोटात खूप वेदना होत होत्या. सुरुवातीला त्याला औषधे घेण्याचा सल्ला देण्यात आला. तथापि, जेव्हा वेदना वाढली, तेव्हा अभिनेत्रीला काही टेस्ट करण्यास सांगितले, ज्याने तिच्या यकृतामध्ये ट्यूमर असल्याचे उघड झाले.तो म्हणाला, “आमच्या डॉक्टरांनी आम्हाला पुन्हा भेटायला सांगितले आणि जेव्हा आम्ही त्याला भेटलो, तेव्हा त्यांनी आम्हाला सीटी स्कॅन करण्यास सांगितले. सिटी स्कॅन रिपोर्ट आल्यानंतर दीपिकाच्या यकृताच्या डाव्या भागात ट्यूमर असल्याचे समजले. हा ट्युमर आकारात टेनिस बॉलइतका मोठा आहे. आमच्यासाठी हे खूप धक्कादायक होते”.