Mumbai Local Video : मुंबईची लाईफ लाइन म्हणजे लोकल ट्रेन. याच लोकल ट्रेनने नेहमी हजारो लोक प्रवास करत असतात. कामाच्या धावपळीमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असल्यास ट्रेन हा उत्तम पर्याय. मुंबई लोकल ट्रेन कधीच शांत आपण पाहिली नाही. लांबचा पल्ला गाठणारे प्रवासी तर ट्रेनमध्ये बसल्यावर अक्षरशः पाया पडतात. प्रवास सुखकर होऊदेत म्हणून प्रार्थना करतात. प्रवास सुखकर करणारी हिच लोकल ट्रेन मात्र अलिकडच्या काही काळात गच्च भरलेली दिसते. अक्षरशः जीवघेणा प्रवास केला जातो. वेळेत पोहोचण्याची धडपड तर कोणाला पुन्हा ट्रेन वेळेवर मिळणार नाही याची भीती. मग अशावेळी बऱ्याचदा लोकलमध्ये हाणामारीही होते. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. (Mumbai local train fight video)
अंबरनाथ लोकलमध्ये काय घडलं?
CSMT ते अंबरनाथ लोकलमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, लोकलच्या जनरल डब्यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती दुसऱ्या महिला प्रवाशीला मारहाण करताना दिसत आहे. पण ही लोकल नक्की किती वाजताची होती?, ज्या महिलेला मारहाण केली ती कोण होती? याबाबात कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मात्र या मारहाणीचा व्हिडीओ शूट करण्यात आला.
पाहा व्हिडीओ
व्हिडीओमधील सत्य काय?
ज्या महिलेला मारहाण झाली तिने आधी बाजूला बसलेल्या कुटुंबाला शिवीगाळ केली. खरं तर आईवरुन शिवी दिली. कुटुंबातील व्यक्तींना शिवी दिल्यामुळे पुरुषाला राग अनावर झाला. त्याने हातातील बॅगने महिलेला हाणामारी करण्यास सुरु केली. हा संपूर्ण प्रकार घडत असताना इतर प्रवाशी पुरुषाला थांबवत होते. महिलेला मारु नको म्हणून सतत सांगत होते. “तू आईवरुन शिवी दिलीच कशी?” असं त्या पुरुषाने महिलेला विचारलं आणि मारायला सुरुवात केली होती.
काय कारवाई होणार?
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काय कारवाई होणार? असा प्रश्न सोशल मीडियाद्वारे विचारला जात आहे. नेटकऱ्यांनीही विविध कमेंट्स केल्या आहेत. महिलेने शिवीगाळ केली आहे, तिच चुकीची आहे, आईवरुन शिवी का दिली?, स्वतः मारण्यापेक्षा पोलिसांकडे जायला हवं होतं, मारहाण करणाऱ्या पुरुषाला तुम्ही पाठिंबा देत असाल तर चुकीचं आहे, कोणीच आपल्या आईवरुन दिलेली शिवी ऐकू शकत नाही, काय आगाऊ माणूस आहे? अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.