२०२०-२१मध्ये करोना (corona virus) या आजाराने डोकं वर काढलं. इतकंच काय तर संपूर्ण जग यामुळे थांबलं होतं. प्रत्येकाची सुरक्षा म्हणून लॉकडाऊन करण्यात आलं. दरम्यान हा संपूर्ण काळ भीषण होता. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं. करोना झाला असल्यास सगळ्यांपासून लांब राहण्याची वेळ कित्येकांवर आली. मात्र करोना लस आल्यानंतर आजाराचा प्रभाव हळूहळू कमी होत गेला. काही महिन्यांच्या अवधीनंतर जनजीवन सुरळीत झालं. आता पुन्हा एकदा करोना डोकं वर काढू पाहत आहे. महाराष्ट्रात या आजाराचे वाढते रुग्ण पाहता अनेकांना धक्का बसला आहे. पण आता करोनाचं स्वरुप वेगळं असणार का?, त्याची लक्षणं नक्की काय? हे सविस्तर समजून घेऊया. (Mumbai corona cases)
करोना रुग्णांची संख्या आत दिवसेंदिव वाढत आहे. मुंबई महापालिका भागातच ५३ करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातही करोनाचे काही रुग्ण आढळले आहेत. राज्यात करोना रुग्णांची संख्य वाढत असताना आता देशभरातही याचा जोर वाढला आहे. देशभरात एकूण २५७ करोना रुग्ण समोर आले आहेत. पण देशाच्या आरोग्य व्यवस्थेकडून एक माहिती समोर आली आहे. आताचा करोना एक नवीन प्रकार असल्याचं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच हा करोना नवा व्हेरिएंट आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…
नव्या करोनाची लक्षण काय?
करोना असलेल्या रुग्णांना ताप, खोकला, घसा दुखणे, खवखवणे, अंगदुखी, थकवा, डोकेदुखी जाणवते. बऱ्याचदा कोरडा किंवा कफ असलेला खोकलाही होतो. मात्र आता या सगळ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबरीने वास न येणे, चव जाणे ही लक्षण जोडीला आहेतच. आताच्या करोनाची लक्षणं ही पूर्वीच्या करोनासारखीच आहेत. मात्र आता गंभीर परिस्थितीत श्वास घेण्यासही मोठा त्रास होऊ शकतो अशी शक्यता आहे.
नवीन करोना धोकादायक आहे का?
सिंगापूर व हाँगकाँगमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. करोना वाढत असल्यामुळे सिंगापूरमध्ये अलर्टही जारी करण्यात आला आहे. हा आजार आता पुन्हा एकदा हात-पाय पसरत आहे. नवा करोना हा आधीच्या करोनापेक्षा गंभीर असल्याचं बोललं जात आहे. सिंगापूरच्या आरोग्य विभागातून देशातील जनतेला पुन्हा लस घेण्याचे आव्हाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा – लोक मारायला जमले, दारू प्यायला आहे ओरडले अन्…; अपघात प्रकरणात अडकलेला अभिजीत सावंत, पोलिस स्टेशनमध्ये बसून…
करोनासाठी राज्यात सुविधा काय?
राज्यभरात करोना रुग्ण वाढत असताना सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. कस्तुरबा रुग्णालयामध्ये वेगळा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. तसेच दोन बेडची ICU व्यवस्था करण्यात आली आहे. तर सेव्हन हिल्स रुग्णालयातही विविध बेडची सुविधा तयार ठेवण्यात आली आहे. तसेच रुग्णांची संख्या तसेच करोनाचा प्रभाव लक्षात घेता वेळेनुसार अधिक बेडची सुविधा करण्यात येणार आहे. दरम्यान बिग बॉस फेम अभिनेत्री शिल्पा शिरोडकरलाही करोना झाला असल्याचं समोर आलं आहे.