Parth Samathaan On Cid : सोनी टीव्हीच्या लोकप्रिय शो सीआयडीच्या दुसर्या सत्रात नवीन ट्विस्ट आणि वळण येताना पाहायला मिळत असल्याने हा शो अधिकच रंगतदार होत आहे. एसीपी प्रदुमनच्या भूमिकेत शिवाजी साटम दिसणार नसल्याने मात्र प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळाली. तर अभिनेता पार्थ समथनची नवीन एसीपी म्हणून या शोमधील प्रवेशही अनेकांना खटकला. तथापि, निर्मात्यांच्या या रणनीती प्रेक्षकांना काही विशेष खास वाटत नसल्याचं कमेंटवरुन समोर आलं आहे. नवीन एसपी आयुष्मानच्या भूमिकेत सोशल मीडियावर पार्थला ट्रोल करीत आहेत. ज्यावर आता स्वतः पार्थने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला आहे की तो शोमध्ये शिवाजी साटमची जागा घेण्यासाठी आलेला नाही, परंतु तो त्याचा एक मोठा चाहता आहे.
पार्थ सामाथन याने ‘इंडिया फोरम’शी विशेष संभाषणात म्हटले आहे की, “मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की ट्रोलिंग इतक्या वेगवान होईल अशी मला अपेक्षा नव्हती. हे सर्व कुठून येत आहे हे मला देखील समजले आहे. मी शिवाजी सर आणि मूळ पात्रांचा चाहता आहे. जर मी प्रेक्षकांच्या जागी राहिलो असतो तर कदाचित अशा कोणत्याही पात्रात कोणतीही नवीन व्यक्ती पाहून मलाही असे वाटले असते”.
पार्थ समथन पुढे म्हणाला, “मी वेगळ्या उद्देशाने सीआयडीमध्ये सामील होण्यासाठी आलो आहे. हे कथेद्वारे समोर येईलच. माझ्या शोमधील माझे पात्र स्वतंत्र व्यक्ती म्हणूनच आहे. सध्या आयुष्मानचा इतर अधिकाऱ्यांशी तितकासा संबंध नाही. हा तणाव संपणार नाही. शोमधील एखाद्या आख्यायिकेचे पात्र स्वीकारणे कधीही सोपे नाही. मी त्याची जागा घेण्यासाठी येथे आलो नाही. मी वारशाचा आदर करण्यासाठी काहीतरी नवीन आणले आहे”.
आणखी वाचा – “बिकिनी घाल असं ते मला बोलले अन्…”, नयना आपटेंनी सांगितला ‘तो’ अनुभव, म्हणाल्या, “काम मिळवण्यासाठी…”
पार्थने आता या शोमध्ये त्याला केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगबाबत सडेतोडपणे भाष्य करत नेटकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे. सोनी टीव्ही तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म ‘सोनी लिव्ह’ आणि ‘नेटफ्लिक्स’वर हा सुपरहिट शो पाहता येणार आहे.