सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल त्यांच्या लग्नाच्या घोषणेपासून चर्चेत आहेत. याआधी या जोडप्याला आंतरधर्मीय विवाहासाठी खूप ट्रोल करण्यात आले होते. अशातच ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत सोनाक्षी व झहीरने २३ जून रोजी वांद्रे येथील दिवाणी न्यायालयात त्यांचे कुटुंबीय व जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. यानंतर त्यांच्या लग्नाच्या ग्रँड रिसेप्शन सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोनाक्षी व झहीर मुंबईतील एका रुग्णालयात गेले होते, त्यानंतर अभिनेत्री गरोदर असल्याच्या अफवा पसरु लागल्या होत्या. आता खुद्द सोनाक्षी सिन्हाने या अफवांवर मौन सोडले असून, तिने आपल्या वक्तव्याने नेटकऱ्यांना चांगलंच उत्तर दिलं आहे. (Sonakshi Sinha On Pregnancy)
सोनाक्षीला तिच्या झहीरबरोबरच्या आंतरधर्मीय विवाहाबाबत अनेक ट्रोलचा सामना करावा लागत आहे. या जोडप्याने २३ जून रोजी लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या काही दिवसांनंतर सोनाक्षी गरोदर असल्याच्या इंटरनेटवर अफवा पसरल्या. सोनाक्षी तिचा आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट ‘काकुडा’च्या प्रदर्शनासाठी सज्ज आहे. तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत सोनाक्षीने झहीर इक्बालबरोबरच्या लग्नानंतरच्या आयुष्याविषयी भाष्य केले.
आणखी वाचा – लग्नानंतर कसं आयुष्य जगत आहे सोनाक्षी सिन्हा? , म्हणाली, “लग्नानंतरची परिस्थिती…”
सोनाक्षी सिन्हाला झहीर इक्बालबरोबरच्या लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल विचारण्यात आलं होतं. ज्यावर तिने उत्तरं दिलं. झूम या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली, “या नात्याचे सौंदर्य हे आहे की मला पूर्वीसारखेच वाटते. मला आनंद आहे की, माझे आयुष्य लग्नाआधी अगदी सेट झाले होते आणि मी कामावर परत आल्याने मला आनंद झाला”.
सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या गरोदरपणाच्या इंटरनेटवर पसरलेल्या अफवांबद्दलही सांगितले. ती म्हणाला, “बदल एवढाच आहे की, आता मी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही, कारण मी तिथून निघताना दिसले की लोकांना वाटते की मी गरोदर आहे आहे. एवढाच फरक आहे”. असं म्हणत सोनाक्षीने गरोदर नसल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.