KRK Video On Govinda Mental Health : गोविंदाबाबत नेहमीच काही ना काही बातम्या कानावर येत असतात. कधी तो त्याच्या वैयक्तिक कारणामुळे तर कधी त्याच्या करिअरमुळे तर कधी त्याच्या वेगळ्याच हालचालींमुळे तो चर्चेत राहिला आहे. असं पाहता जेव्हापासून गोविंदाने राजकारणात प्रवेश केला तेव्हपासून बॉलिवूडकडे त्याने पाठच फिरवली. सध्या गोविंदाने तर बॉलिवूडमधून ब्रेकच घेतला आहे. याचा दोष गोविंदाच्या चाहत्यांनी बॉलिवूडलाच दिला. बॉलिवूडने गोविंदाचे करिअर खराब केले असा दावा काहींनी केला. आता तर काय गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा लग्नाच्या ३८ वर्षांनंतर वेगळे होणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. अद्याप, दोघांनीही या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे या चर्चा खऱ्या की खोट्या हा प्रश्न तसाच आहे.
गोविंदा चर्चेत असतानाच आता वादग्रस्त ट्विट आणि वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असलेल्या केआरकेनं म्हणजे कमाल आर खान यानं गोविंदाबद्दल धक्कादायक दावा केला आहे. गोविंदा सध्या मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा दावा त्याने थेट या व्हिडीओमध्ये केला आहे. हा दावा खरा ठरवत त्याने सेटवरील काही किस्सेही व्हिडीओदरम्यान सांगितले. या व्हिडीओमध्ये केआरके म्हणाला, “असे बरेच लोक आहेत जे हे बोलून गेले आहेत की गोविंदा एकप्रकारे मानसिकदृष्ट्या अस्थिर झाला आहे. त्याच्या वागणुकीने कोणीही घाबरुन जाईल”.
आणखी वाचा – CID मधील नवा एसीपी प्रेक्षकांना पटेना, सीन पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, “सर्वात वाईट अभिनय…”
पुढे तो म्हणाला, “२००८ मध्ये जेव्हा गोविंदा गणेश आचार्य यांच्यासह ‘मनी है तो हनी है’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता तेव्हा त्यानं सिनेमा सुपरहीट व्हायला दिग्दर्शक गणेश आचार्य यांना एका सीनमध्ये कोंबडी दाखवूया आणि आज पूर्ण दिवस मी त्या कोंबडीबरोबर शूट करणार कारण तसं करण्यास मला माझ्या गुरुजींनी सांगितलं आहे, असा काहीसा उपाय चित्रपट सुपरहिट होण्यासाठी सांगितला होता. हातात अंगठ्या, ग्रहांचे ब्रेसलेट, गळ्यात अनेक माळा परिधान करुन फिरणारा गोविंदा मानसिकदृष्ट्या खरंच अस्थिर आहे”.
आणखी वाचा – “मला फरक पडत नाही”, गोविंदाबरोबर एकत्र राहण्यावरुन पत्नीचं भाष्य, कॅमेऱ्यासमोर असं काही बोलली की…
पुढे आणखी एक किस्सा सांगत तो म्हणाला, “इतकंच नाहीतर २००९ मध्ये आलेल्या ‘लाइफ पार्टनर’ सिनेमाच्या सेटवर तो दिवंगत आईबरोबर दोन-दोन तास गप्पा मारायचा. त्याच्या भावाला त्याने फोन करुन आईला सेटवर घेऊन येण्यासही सांगितलं होतं, त्यावेळी वर्षभरापूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते, अशा काही हरकतींमुळे गोविंदा लोकांच्या नजरेत आला आणि चर्चेचा विषय बनला, त्याच्या या वागणुकीमुळे सेटवरील पूर्ण टीमही घाबरली होती. जे लोक म्हणतात की, बॉलिवूडनं गोविंदाचं करिअर उद्ध्वस्त केलं, ते चुकीचं आहे. त्यानं स्वत:च्या हातानं त्याचं करिअर उद्ध्वस्त केलं आहे. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे”.